Rajesh Tope : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना गुरुवारी कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचा मानाचा गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान कऱण्यात आला.  पुरस्कार स्विकारल्यानंतर बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'कोरोना महामारीतील कामामुळे मला लोक डॉक्टर म्हणून ओळखू लागले.' कुसमाग्रज प्रतिष्ठान आयोजित गोदावरी गौरव पुरस्काराने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (लोकसेवा) ,हेमचंद्र प्रधान (ज्ञान ), सुधीर पटवर्धन ( चित्र), सुरेश तळवलकर (संगीत ) अतुल पेठे (नाट्य ) सीताबाई घारे ( साहस ) यांना  गौरविण्यात आले. पुरस्कारावेळी मिळालेली रक्कम राजेश टोपे यांनी प्रतिष्ठानला दिली. 


कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड गोदावरी गौरव पुरस्कार दिला जातो. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून लोकसेवा, कला नाट्य,साहित्य साहस आशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्याना मानाचा पुरस्कार देऊन गौरविले जाते. कोरोना काळात दिवसरात्र महाराष्ट्राची सेवा करणाऱ्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यांसह, डॉ हेमचंद्र प्रधान, सुधीर पटवर्धन, पंडीत सुरेश तळवलकर, अतुल पेठे, सीताबाई घारे यांचा सन्मानित करण्यात आले.  मी इंजिनिअरिंग केलेला कार्यकर्ता आहे. पण कोरोना काळात केलेल्या कामामुळे डॉ. टोपे म्हणून ओळखला जाऊ लागलो. लोक मला डॉक्टर समजतात, असे पुरस्कारावेळी मंत्री राजेश टोपे म्हणाले. यावेळी बोलताना टोपे म्हणाले की, समाजाला दिशा दाखवण्याचे काम कुसमाग्रजांनी केलं आहे. या पुरस्काराच्या 16 व्या वर्षी सामजिक कार्याचा पुरस्कार मला मिळाला. या पुरस्कारामुळे मला पुढील काळात काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.  


आपण समजाचे काही देणं लागतो, या विचारला धरून प्रेरणा शिकवण घेऊन मी जाईल. 11 रुपयांचा मास कोविडमध्ये 250- 300 ल विकला जायचा. नाशिकची ऑक्सिजन दुर्घटना सोडली तर ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून तो रुग्ण मेला असा महाराष्ट्रात झालं  नाही. जे काही मृत्यू झाले ते स्पष्टपणे पोर्टलवर टाकले आहेत. इतर राज्यांप्रमाणे प्रेत वाहत गेले असे काही घडलं नाही. जी रुग्ण संख्या आहे ती आम्ही रोज पोर्टलवर टाकली आहे.  महाराष्ट्राची संख्या जास्त तर जास्त पण रुग्ण संख्या खरी अपलोड केली  आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.