Eknath Shinde: शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर  शनिवारी (दि. १०) जाहीर सभा पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Election 2026) महायुतीची सत्ता आल्यास पाचशे चौरस फुटापर्यतच्या घरांना घरपट्टी माफ, सिडकोतील पंचवीस हजार घरे फ्री होल्ड, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या तपोवनवरून भाजपला सर्व विरोधक घेरत आहे, तेथील झाडे वाचवण्याचे आश्वासन देत भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मी आपल्याला शब्द देतो, तुम्ही नाशिक महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्या. आम्ही नाशिकची आईसारखी सेवा करू, असा शब्द देखील त्यांनी नाशिककरांना दिला. तसेच दत्तक नाशिकवरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 

Continues below advertisement

Eknath Shinde: नाशिक महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्या

एकनाथ शिंदे म्हणाले की, नाशिकमध्ये सत्ता मिळूनही कुठलीच कामे मागील काही वर्षात झाली नाही. काही लोकांनी नाशिक दत्तक घेऊनही काहीच झाले नाही. मात्र मी आपल्याला शब्द देतो, तुम्ही नाशिक महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्या. आम्ही नाशिकची आईसारखी सेवा करू. कारण आमचा अजेंडा हा विकासाचा असून आम्ही प्रगती करणारे आहोत. स्थगिती देणारे नाही, असे त्यांनी म्हटले.  

Eknath Shinde: आमची युती ही विकासासाठी

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, नाशिकमध्ये होऊ घातलेल्या सिहंस्थ कुंभमेळा निमित्ताने हजारो कोटीची कामे शहरात होणार आहे. नाशिकसाठी आपण हजारो कोटींचा निधी विकास कामासाठी मंजूर केला आहे. सर्वसामान्य लोकांना सोन्याचे दिवस आणायचे आहे. त्यासाठी आपले प्रयत्न आहे. नाशिक मधील युतीचे सर्व उमेदवार तगडे आहे. प्रभू रामचंद्रांचे निशाण धनुष्यबाण आहे. आमची युती ही विकासासाठी आहे. अनेक वर्ष सत्ता असताना यापूर्वीच्या लोकांनी काही केले नाही. नाशिकचा चेहरा मोहरा आम्ही बदलणार आहोत. यासाठी तुमची साथ हवी आहे. नाशिकमधील प्रत्येक विभागात स्पर्धा परीक्षा सेंटर सुरू केले जाईल. या निवडणुकीतून विरोधकांचा टांगा पलटी करायचा, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.  

Continues below advertisement

Eknath Shinde: लाडकी बहीण योजना सुरूच राहणार 

लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून त्यात काही जणांनी विघ्न आणायचे काम केले. अगदी न्यायालयात काहीजण गेले. मात्र त्यांना लाडक्या बहिणींनी आडवे केले. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असून ती कोणीही बंद करू शकणार नाही, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले. 

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधी नाशिक शहरात ठाकरे बंधूंचा सुंभमेळा भरला होता. बिस साल बाद एकत्र आले कारण तीस साल बाद काय होणार? याची त्यांना चिंता सतावते, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर केली. कोणी कोणाशी युती करू द्या, नाशिककर महायुतीचा भगवा फडकणार, मनपावर फडकणार, असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला. काही लोक निवडणूकीत पावसाळ्यातील छत्री प्रमाणे उगवतात. दिवसभर नेटफ्लिक्स पाहायचे, जनतेच्या प्रश्नात त्यांना कोणताही रस नाही, अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. तर काही लोकांना विकासापेक्षा तिजोरीमध्येच अधिक रस असल्याची टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

आणखी वाचा 

Dagdu Sakpal : शिवडीत ठाकरेंना धक्का! जुन्या शिलेदाराने साथ सोडली, माजी आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार