Continues below advertisement

मुंबई : एकीकडे ठाकरे बंधू मुंबईतील त्यांच्या पहिल्या संयुक्त सभेच्या तयारीत असताना दुसरीकडे शिवडीतील जुन्या शिलेदाराने उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचं दिसून आलं. शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ (Dagdu Sakpal) यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचं निश्चित केलं आहे. रविवारी हा पक्षप्रवेश होणार आहे. दगडू सकपाळांनी साथ सोडल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.

दगडू सकपाळ हे ठाकरेंच्या सेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख आहेत. महापालिका निवडणुकीत मुलीला उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते. रविवारी सकाळी 10 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तगिरी या उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Continues below advertisement

पक्षाला गरज संपली, सकपाळांनी नाराजी

दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ या शिवडी विधानसभेतील प्रभाग क्र. 203 मधून इच्छुक होत्या. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांना तिकिट देण्यात आलं नाही. त्यामुळेच दगडू सकपाळ नाराज असल्याची चर्चा होती.

मुलीला तिकीट दिलं नाही, पण पक्षाकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही. म्हातारं झाल्यामुळे पक्षाला आपली गरज संपली अशा शब्दात दगडू सकपाळ यांनी नाजारी व्यक्त केली होती.

दोन दिवसापूर्वी, मध्यरात्री दगडू सकपाळ यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळ येथील राहत्या घरी भेट घेतली होती. त्यानंतर दगडू सकपाळांनी शिंदे गटात जाण्याचे संकेत दिले होते. इतर कुणाला जर आपली गरज असेल तर आपण त्यावर विचार करू असं म्हणत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले होते.

Uddhav Raj Thackeray Mumbai Sabha : ठाकरेंच्या पहिल्या सभेवेळीच धक्का

दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महापालिका निवडणुकीतील चुरस चांगलीच वाढल्याचं दिसून येतंय. रविवारी संध्याकाळी ठाकरे बंधूंची मुंबईतील पहिली सभा होणार आहे. परंतु त्यांच्या आधीच शिवडीतील त्यांच्या जुन्या सहकाऱ्याने साथ सोडल्याने ठाकरेंसाठी तो मोठा धक्का मानला जात आहे.

ही बातमी वाचा: