उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकांची आदर्श आचारसंहिता संपूर्ण राज्यात लागू होताच राज्य निवडणूक आयोग जोमाने कामाला लागलं आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, शासकीय सार्वजनिक /खाजगी संपत्तीचे विद्रुपीकरण यांसारख्या अनेक बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींची शासकीय वाहने काढून घेण्यास सुरुवात केली आहे.


लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहितेचा बडगा सुरु झाला आहे. सरकारी कार्यालये ओस पडण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या कामासाठी महामंडळ, जिल्हा बँका, सहकारी संस्था आणि इतर सरकारी विभागाचे वाहन महसूल विभागाने काढून घेतली. राज्य निवडणूक आयोगाकडे आलेल्या माहितीनुसार राज्यातील जवळपास साठ हजार वाहन महसूल विभागाने आपल्या ताब्यात घेतली आहेत.

निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात असंख्य चौकशा, प्रस्ताव राज्यभरातील शासकीय कार्यालयात मुख्यमंत्री कार्यालयाकडून आले. तसेच कोणती कामे करावीत किंवा करु नये याचे स्पष्टीकरण आयोगाकडून मागितलं  आहे.

आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts)ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.nic.in वर निवडणुकीसंदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

या गोष्टींवर करडी नजर 

  • फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरील प्रचारावर, पेड न्यूजवर निवडणूक आयोगाची करडी नजर

  • इव्हीएमची मूव्हमेंट पाहण्यासाठी जीपीएसचा वापर केला जाईल

  • मतदान केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यात येणार

  • निवडणुकीतल्या गैरव्यवहाराबात सामान्य नागरिकही आयोगाकडे थेट तक्रार करु शकणार, अॅपवरील तक्रारदाराचं नाव गुप्त राहणार, 100 मिनिटांच्या आत अशा तक्रारींना प्रतिसाद आयोगाचे अधिकारी देणार.

  • मतदानाच्या 48 तास आगोदर लाऊड स्पीकरची परवानगी नसेल

  • रात्री दहानंतर प्रचाराला मुभा नाही, रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही


लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या तारखा

  • पहिल्या टप्प्यात (11 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 07 जागांवर मतदान

  • दुसऱ्या टप्प्यात (18 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 10 जागांवर मतदान

  • तिसऱ्या टप्प्यात (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 14 जागांवर मतदान

  • चौथ्या टप्प्यात (29 एप्रिल) महाराष्ट्रातील 48 पैकी 17 जागांवर मतदान


संबंधित बातम्या

लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी

ईव्हीएमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे महत्त्वपूर्ण निर्णय

लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी


लोकसभा निवडणूक 2014 : देशभरातील पक्षीय बलाबल




लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात कुठल्या मतदारसंघात कधी होणार मतदान