Dharashiv District Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत अनेक पक्ष मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांविरोधात उभी ठाकली आहे. याशिवाय माजी खासदार राजू शेट्टी आणि प्रहारच्या बच्चू कडूंची तिसरी आघाडी देखली निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी काटे की टक्कर होणार असल्याचे बोलले जात आहे.
धाराशिव जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये एका दोन विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळत आहे. एका मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. याशिवाय एका मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार आहे.
कळंब धाराशिव मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून अजित पिंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार कैलास पाटील मैदानात आहेत.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने धीरज पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने मधुकरराव चव्हाण यांचे तिकीट कापले आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने स्नेहा सोनकाटे यांना उमेदवारी दिली आहे.
परांडा विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेने मंत्री तानाजी सावंत यांना मैदानात उतरवले आहे. तर त्यांच्याविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने राहुल मोटे यांना उमेदवार दिली आहे. उद्धव ठाकरेंनी रणजीत पाटील यांना एबी फॉर्म दिला होता, मात्र, ऐनवेळी त्यांना माघार देखील घेण्यास सांगण्यात आले होते.
उमरगा विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेने ज्ञानराज चौगुले यांना उमेवदारी दिली आहे. तर ठाकरेंच्या शिवेसेनेकडून प्रवीण स्वामी यांना मैदानात आहेत.
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | महाविकास आघाडी | महायुती उमदेवार | विजयी उमेदवार |
1. | कळंब धाराशिव | कैलास पाटील - ठाकरे गट | अजित पिंगळे - शिंदे गट | |
2. | परांडा | राहुल मोटे - शरद पवार गट | तानाजी सावंत - शिंदे गट | |
3. | तुळजापूर | धीरज पाटील - काँग्रेस | राणा पाटील - भाजप | |
4. | उमरगा | प्रवीण स्वामी - ठाकरे गट | ज्ञानराज चौगुले - शिंदे गट |
लोकसभा निवडणुकीत धाराशिवमध्ये ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना तीन लाखांपेक्षा जास्त लीड मिळाला होता. त्यामुळे अनेक मतदारसंघात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असल्याचे बोलले जाते. याशिवाय धाराशिवमधील 4 मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या