Satej Patil, कोल्हापूर : भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे जोरदार टीका केली होती. महिलांना धमकी दिली तर मुन्ना तुझा हात जागेवर ठेवणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यानंतर धनंजय महाडिक म्हणाले की,"माझा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर नाही". दरम्यान, धनंजय महाडिक यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर माजी मंत्री सतेज पाटील यांनी त्यांना टोला लगावलाय.
सतेज पाटील काय म्हणाले?
सतेज पाटील धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, मी त्यांना सांगू इच्छितो. 2 लाख 70 हजार मतांनी तुमचा भांग विस्कटण्याचं काम या कोल्हापूरच्या जनतेने केले आहे.
आत्तापर्यंत काय काय घडलं?
भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. जर महाविकास आघाडीच्या सभेला जाणाऱ्या महिला आढळल्यास त्यांचे फोटो काढून पाठवा, त्यांची व्यवस्था करतो अशा शब्दात जाहीर धमकी महाडिक यांनी दिली होती. महाडिक यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. धमकी देतोस की काय? मुन्ना तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी धनंजय महाडिक यांना इशारा दिला होता.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केल्यानंतर धनंजय महाडिक प्रत्युत्तर देताना म्हणाले,"उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत जाऊन सांगत आहेत, की मुन्ना महाडिक यांचा हात तोडा, पाय तोडा असं म्हणतात. उद्धव साहेब मी तुमची माफी मागतो, मला तुमचा अवमान करायचा नाही, पण मी सांगतो मुन्ना महाडिकाचा भांग देखील कोण वाकडा करू शकत नाही, असा कोण पृथ्वीवर जन्माला आलेला नाही". आता सतेज पाटील यांनी धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर दिलं आहे. सतेज पाटील धनंजय महाडिकांना प्रत्युत्तर देताना म्हणाले, मी त्यांना सांगू इच्छितो. 2 लाख 70 हजार मतांनी तुमचा भांग विस्कटण्याचं काम या कोल्हापूरच्या जनतेने केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या