Devendra Fadnavis on Prithviraj Chavan, कराड : "23 तारखेला अतुल भोसले हे दक्षिण कराडचे आमदार होणार आहेत. सगळ्या बहिणींचा आशिर्वाद आहे म्हणून आम्ही येथे आहोत. आता वारं बदललं आहे. आगोदर थोडी चुक झाली. पृथ्वीराज बाबा हे विधानसभेच मटेरीयल नाही. ते आंतरराष्ट्रीय मटेरीयल आहेत", असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दक्षिण कराडमध्ये भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.


देवेंद्र फडणवीस म्हणाले,  तुम्ही अतुल भोसलेंना अडवून ठेवलंय.....कराडात कृष्णाच्या समुहातून खूप मदत केली...कोविड काळात कृष्णा हॉस्पिटल नसते तर काय झाले असते...हजारोंना उपचार मिळाले. छत्रपती स्टेडियम आहे...परंतू याचा विकास नाही ..बाबांना सांगूनही ते पुर्ण केले नाही ...100 कोटी दिले आहेत....अतुलबाबांनी प्रस्ताव दिला....आमच्या पेनाला लकवा मारत नाही ...असं शरद पवार म्हणाले होते. आमचा पेन नॉन स्टॉप आहे..बाबा एकच ...पृथ्वीराज नाही तर अतुल बाबांना निवडून द्या. 


52 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आणली


पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराजवळील झोपडपट्टी....खाजगी जमिन असलीतरी ती जमिन आमच्याकडे घेतो.,,अवास योजनेतून ती पक्की करतो..,,हा देवाभाऊचा शब्द आहे. कराडला मोठा इतिहास आहे...तुम्हाला एमआयडीसीही होईल....52 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आणली....चिंता करू नका मोठी गुंतवणूक येतेय. नवीन योजना आणली आहे...सहकारी पाणी योजना आता सोलरवर आणण्यासाठी 3000 कोटी रूपये बाजूला ठेवले आहेत, असंही फडणवीस म्हणाले. 


राहुल गांधी अमेरिकेत जाऊन आरक्षणाबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत


पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जम्मू-काश्मिरमध्ये भारताचे संविधान लागू करुन संविधान रक्षण करण्याचे काम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. जम्मू काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच तेथील मुख्यमंत्र्यांनी संविधान हातात घेऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन आरक्षणाबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत. मात्र यावेळी त्यांचे फेक नॅरेटीव्ह चालणार नाही.


आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, भावांतर योजनेसह अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. तसेच माझी लाडकी बहीण, एसटी प्रवासात सवलत, मोफत शिक्षण अशा योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने राबविल्या आहेत. या सर्व योजनांची सविस्तर माहिती यावेळी दिली.मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी दोन्ही उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन यावेळी केले.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Narayan Rane : आम्ही सगळे एकत्रच, 'ना बटेंगे ना कटेंगे', एखाद्याच्या वक्तव्याचा किती कीस पाडायचा? अजित पवारांच्या वक्तव्यावर नारायण राणे काय म्हणाले?