Devendra Fadnavis on Vinod Tawde, नागपूर : "विनोद तावडे आमचे राष्ट्रीय महामंत्री आहेत. ते त्याठिकाणी केवळ कार्यकर्त्यांना भेटायला गेले होते. त्यांच्या जवळ कोणताही पैसा सापडलेला नाही. कोणत्याही आक्षेपार्ह गोष्टी त्यांनी सांगितलेल्या नाहीत. उलट त्यांच्यावरच हल्ला झालेला आहे. आमचे नालासोपाराचे उमेदवार राजन नाईक यांच्यावर देखील हल्ला झालेला आहे. महाविकासकडून पराभव कव्हर करण्यासाठी हे आरोप केलेले आहेत. विनोद तावडे कोठेही या प्रकरणात दोषी नाहीत. त्यांनी कोणतेही पैसे नेले नाहीत", अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर करण्यात आलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांवर भाष्य केलं आहे. ते नागपुरात बोलत होते. 


काय आहे प्रकरण?


विरार येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे, भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्याकडून पैशाचं वाटप करण्यात येत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केला होता. हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी विनोद तावडेंवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. या प्रकरणी विनोद तावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अनिल देशमुख सिनेमातील स्टोरी सांगतात, देवेंद्र फडणवीसांचा टोला 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदी पिक्चरमध्ये सलीम जावेद यांच्या स्टोरी या अतिशय लोकप्रिय होत्या. तशाच स्टोरीज अनिल देशमुख यांनी सांगण्यास सुरु केल्या आहेत. या अगोदर त्यांनी तसंच पुस्तक काढलं. आता असाच हमला ते दाखवत आहेत. आज पोलीस आयुक्तांनी याबाबत पत्रकार परिषद घेतली आहे. ती मी आत्ता पाहिलेली आहे. त्या पत्रकार परिषदेत काय घडलंय ते सगळं क्लिअर झालं आहे. 10 किलोचा गोटा जर कारच्या पुढील बाजूस मारला. तर ती काच तुटली का नाही? 10 किलोचा गोटा पडला तरी बोनेटला स्क्रॅच सुद्धा आला नाही. एकच गोटा देशमुखांच्या कारमध्ये दिसतोय. हा गोटा मागील कार फोडून मारलेला आहे. मागील काचेतून दगड मारलाय, तर मागे लागायला हवा होता. तो समोर कसा लागला? अशा प्रकारचा दगड रजनीकांतच्या सिनेमात फेकला जाऊ शकतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Vinod Tawde VIDEO : मुख्यमंत्रिपदाची इच्छा व्यक्त केल्याने तावडे अडचणीत आले का? विनोद तावडे म्हणाले, माझंही ठरलंय...


Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा