Continues below advertisement

पुणे : राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडाला असून आज सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या जाहीर सभा होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नाशिकच्या गोदावरी काठावर सभा घेतल्यानंतर पुण्यात (Pune) रोड शोसाठी दाखल झाले आहेत. दुसरीकडे मुंबईत ठाकरे बंधूंची एकत्र जाहीर सभा होत आहे. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्राचे लक्ष मुंबईकडे लागले असतानाचा पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आगीची घटना घडली. भोसरीत मुख्यमंत्र्यांचा रोड शो सुरु असताना ही आगीची (Fire) घटना घडली, येथील एका इमारतीवर रोड- शो दरम्यान फटाके वाजवताना आग लागली होती.

पुण्यातील भोसरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरु असताना फटाक्यांमुळे एका इमारतीत आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर, तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाच्या जवनांकडून आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने कुठलीही हानी झाली नसली तरी आगीच्या घटनेत इमारतीवरील मोबाईल टॉवर जळून खाक झाल्याचीही माहिती आहे. या घटनेनं परिसरात गोंधळ उडाला होता, तसेच काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.

Continues below advertisement

दरम्यान, आपल्या रोड शो वेळी मुख्यमंत्री पिंपरी चिंचवड पोलिसांवर संतापल्याचं दिसून आलं. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना रोखण्यास दोर लावला होता, मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून लावण्यात आलेला दोऱ्यांचा वेढा काढायला सांगितला.

हेही वाचा

मोठी बातमी! 15 बिनविरोध आलेल्या डोंबिवलीत भाजपकडून 3000 चे पाकीटं, शिंदेसेनेनं उघडं पाडलं; पोलीसही पोहोचले