Continues below advertisement

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये जातात. ही रक्कम 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. केंद्राच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ही योजना चालवली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना यो योजनेतून 21 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. ही योजना डिसेंबर 2018 मध्ये जाहीर करण्यात आली होती, तर याचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी 2019 मध्ये देण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. मात्र, सरकारच्या निर्णयानुसार लाभार्थी शेतकऱ्यांनीकेवायसी आणि फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे. जर, ई केवायसी केली नाही किंवा फार्मर आयडी काढला तर 2000 रुपये मिळणं स्थगित होऊ शकतो. त्यामुळं पीएम किसानचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनीकेवायसी आणि फार्मर आयडी काढून घेणं आवश्यक आहे.

Continues below advertisement

PM Kisan : पीएम किसानचा 22 वा हप्ता कधी मिळणार?

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22 व्या हप्त्याची रक्कम मीडिया रिपोर्टसनुसार फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये दिली जाऊ शकते. 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर 22 व्या हप्त्याबाबत अधिकृत तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसानच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी या पीएम किसानच्या पोर्टलला भेट द्यावी. नरेंद्र मोदी यांनी 21 व्या हप्त्याची रक्कम तामिळनाडूच्या कोइंबतूर मधून जारी केली होती. त्यावेळी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18000 कोटी रुपये पाठवण्यात आले होते. पूरस्थितीमुळं काही राज्यांना 21 व्या हप्त्याची रक्कम अगोदर जारी करण्यात आली होती.

शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आवश्यक

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांनी ई- केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे, त्याच प्रमाणं फार्मर आयडी देखील काढणं आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचा फार्मर आयडी तयार झालेला नाही त्यांना 22 व्या हप्त्याचे 2000 रुपये देणं थांबवलं जाऊ शकतं. ई केवायसी पूर्ण असली तर फार्मर आयडी एक डिजिटल ओळख आहे, ज्यात जमिनीचं रेकॉर्ड, पिकांची माहिती आणि इतर माहिती असेल. योजनेचा फायदा पात्र शेतकऱ्यांना मिळावा हा हेतू फार्मर आयडी तयार करण्यामागं आहे.

फार्मर आयडीसोबत शेतकऱ्यांनीकेवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करणं आवश्यक आहे. ई केवायसी पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन किंवा सीएससी केंद्रावर जाऊन करता येऊ शकते. बँक खाते आणि आधार क्रमांकदेखील लिंक असणं आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे जमीन देखील असणं आवश्यक आहे. पीएम किसानचा लाभ विना अडथळा मिळावा असं वाटत असल्यास शेतकऱ्यांनीफार्मर आयडी काढणं आवश्यक आहे.