ठाणे:महापालिकानिवडणुकीतील (Election) प्रचारआताअंतिमटप्प्यातआलाअसूनबूथवरहीकार्यकर्तेआणिपदाधिकारीनियोजनबद्धकामकरतानादिसूनयेतात. मतदारांच्यायाद्याबनवूनत्यांच्यापर्यंतपोहोचण्याचीधडपडसर्वचपक्षाच्याकार्यकर्त्यांचीसुरूआहे. मात्र, काहीठिकाणीमतदारांनाआमिषदाखवण्याचं, पैसेदेण्याचेप्रकारहीउघडकीसयेतआहेत. भाजपने (BJP) सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या कल्याण डोंबिवली (KDMC) महापालिकेतील एका उमेदवाराच्या प्रचारार्थ चक्क पैशांचे वाटप केल्याचं उघडकीस आलं आहे. डोंबिवलीतील एका महिलेच्या घरी पैशांची पाकिटे आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यानपांढऱ्या पाकिटात 3000 रुपये म्हणजे 500 रुपयांच्या 6 नोटा टाकून हे पैसे वाटप केलेजातअसल्याचेनिदर्शनासआले. डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात भाजपकडून तीन हजार रुपयांचीपाकीटे नागरिकांच्या घरी पोहोचवण्यातयेतआहेत. येथील शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यानारंगेहाथ हात पकडल्यानेहेउघडकीसआलंआहे. याघटनेनंतरनिवडणूक आयोगाचे पथक व पोलीसहीघटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध केलेल्या महापालिकेतही भाजप उमेदवाराकडून पैशांचं अशाप्रकारे होत असलेलं वाटप चर्चेत आहे.
दरम्यान, येथील प्रभागात भाजप आणि शिवसेना यांच्यातमैत्रिपूर्ण लढत होत आहे. त्यामुळे, भाजप उमेदवाराविरुद्ध शिवसेना उमेदवार येथे निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामुळे, येथे महायुतीतील दोन पक्षांतच थेट लढत होत असल्याने मोठी रस्सीखेंच पाहायला मिळते. विशूपेडणेकर यांचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं आहे, विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व्हिडिओ बनवून हा पैसे वाटपाचा डाव उधळत असल्याचंही दिसून येतं. त्यामुळे, महायुती म्हणून एकत्र लढणाऱ्या भाजप आणि शिवसेनेतच येथे जुंपल्याचं स्पष्ट होत आहे.
हेही वाचा
नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
