शिवसेनेचा गड अशी नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाची ओळख. शिवसेनच्या माध्यमातून घोलप कुटुंबीयांनी गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघावर एकहाती आपल वर्चस्व कायम राखलं आहे. युती सरकारच्या काळात बबनराव घोलप यांच्या माध्यमातून राज्याला सामाजिक न्याय मंत्री आणि मतदारसंघाला लाल दिवा लाभला.


शिवसेनेच्या पहिल्या फळीतील सैनिकांमध्ये बबनराव घोलापंच नाव घेतल जात. बबनराव सलग पाच वेळा निवडणून आले आहेत. दोन वेळा अपक्ष निवडणूक लढविली 1985 ला भाजपच्या भिकचंद दोंदे यांनी त्यांचा पराभव केला. तर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने 1999 ला शिवसेनेच्या तिकिटावर न लढता अपक्ष निवडणूक लढवून विजयी मालिका कायम राखली. भ्रष्टाचारच्या एका प्रकरणात बबनराव घोलप यांना शिक्षा झाली. निवडणूक लढविण्यास 6 वर्षे बंदी घालण्यात आली. त्यामुळे एनवेळी घोलप यांनी मुलगा योगेश ला 2014 च्या निवडणुकीच्या रणांगणात उतरविले. त्यानेही वडिलांची विजयी पताका उंचावत ठेवली. शिवेनेचा बालेकिल्ला अबधित राखला.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांना 41 हजार 933 मतांची आघाडी मिळाल्याने शिवेनेचा गड मजबूत असल्याचा संदेश गेला. मात्र लोकसभा आणि विधानसभाचे निवडणुकीत फरक असतो. मुद्दे ,आव्हान वेगळी असतात. त्यातच योगेश घोलप यांना टक्कर देण्याच्या तयारीत अनेकानी दोन तीन वर्षापासून मतदारसंघ पिंजून काढायला सुरवात केल्याने घोलप पितापुत्रांची प्रतिष्टा पणाला लागली आहे. घोलप पितापुत्राकडून सलग पाच वेळा मात खाणारे रामदास सदाफुले भाजपकडून याहीवेळी इच्छुक आहेत. भाजप नगरसेविका सरोज आहेर, शिवसेना, मनसे असा प्रवास करुन भाजपत सध्या स्थिरावलेले प्रताप मेहरोलिया भाजपकडून इच्छुक आहेत. यात राजश्री अहिरराव या नावाचा समवेश होतय. अहिरराव सध्या तहसीलदार आहेत प्रशासकीय कामकाज करत असतानाच त्यांनी राजकीय मुस्देगीरीचा वापर करत निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली. त्यांचाही कल भाजपकडे आहे, मात्र हे सर्व इच्छुक शिवसेना भाजप यांच्यातील युती तुटण्याची वाट बघत आयेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्षमण मंडाले यांनी तीन वर्षापासून गावागावात जाऊन भेटीवर भर दिला. दीपक वाघ हा तरुण चेहरा, बबनराव घोलप यांचे पुतणे रविकिरण घोलप, सुनील कोथमिरे अशी नाव चर्चेत आहेत. काँग्रेसने फारसा या मतदार संघाकडे रस दाखविला नाही. तर नुकतीच विचीत आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढविणारे पवन पवार नाशिक पूर्व पाठोपाठ याही मतदारसंघात चाचपणी करतायेत. प्रा संजय जाधव हेही वंचित कडून इच्छुक आहेत.

30 टक्के शहरी आणि 70 टक्के ग्रामीण भाग अशी या मतदारसंघाची रचना आहे. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प, देवळाली छावणी परिषद, स्वातंत्रवीर विंनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी भगूर, शिंदे-पळसे सारख्या ग्रामपालिकांचा समावेश देवळाली मतदारसंघात होतो. एकलहरे विद्युत प्रकल्पातील वीज संच एकापाठोपाठ एक बंद पडतायेत. 640 मेगावॉटचा संच सुरु होत नाही. कामगारांच्या हाताला काम नसल्याने हंगामी कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर आहे.  ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे नाही. प्राथमिक दवाखाने सुस्थितीत नाही. शाळाचा दर्जा चांगला नाही. व्यवसायिक शिक्षण देणारे महाविद्यालय नाही. नदी प्रदूषण, पिण्याच्या पाण्याची समस्या असे अनेक प्रश्न वर्षानुवर्ष जैसे थे आहेत. मात्र सक्षम उमेदवाराचा अभाव, शिवसेनेचा झंजावात या कारणामुळे गेल्या 30 वर्षापासून देवळाली मतदारसंघ आणि घोलप कुटुंब हे समीकरण राहील आहे. याही निवडणुकीत घोलप विजयी घौददोड कायम ठेवतात का याकडे लक्ष लागलंय.

विधानसभेसाठी 2014मध्ये झालेले मतदान

  • योगेश घोलप- शिवसेना- 49,751

  • रामदास सदाफुले- भाजप- 21,540

  • नितीन मोहिते- राष्ट्रवादी काँग्रेस- 18,402

  • प्रताप मेहरोलिया- मनसे- 15,001

  • गणेश उन्हवणे- काँग्रेस- 9,115


लोकसभेसाठी 2019 मध्ये झालेले मतदान

  • हेमंत गोडसे- शिवसेना- 80,688

  • समीर भुजबळ- राष्ट्रवादी- 38,755

  • पवन पवार- वंचित आघाडी- 24,459

  • माणिकराव कोकाटे- अपक्ष- 10,096