Delhi Election Result 2025 Live : जनतेने दिलेला कौल मान्य, अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, पराभव मान्य!
Delhi Assembly Election Results Live : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) पिछाडीवर पडला आहे. भाजप सत्तेच्या दिशेने आगेकूच करत आहे.
पार्श्वभूमी
Delhi Assembly Election Results 2025 LIVE : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली. दिल्लीत तब्बल 13...More
राहुल गांधींमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी 2029ची विधानसभेत माझ्याशी सामना करावा, असं खुलं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधींना दिलंय. पिंपरी चिंचवडमध्ये क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन केल्यावर बावनकुळे यांनी हातात बॅट घेत, चौफेर फटकेबाजी ही केली. दिल्लीकरांनी आपला आणि काँग्रेसला चांगलेच धुतले, आता ईव्हीएम मशीन सेट होती. असा आरोप काँग्रेस आणि संजय राऊत करायला सुरुवात करतील, अशी खोचक टीका ही केली
अरविंद केजरीवाल यांनी जनतेने दिलेला कौल मान्य केला आहे
त्यांनी आपच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
कठीण परिस्थिती असताना आपच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले, असे केजरीवाल म्हणाले आहेत.
यासह आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू, असेही ते म्हणाले.
जे काँग्रेसवाले कुंभमेळ्याला मानत नाही, सनातन धर्माला मानत नाही, हिंदुस्थानच्या लोकांच्या मानत नाही, राम भगवानला असे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या पक्षाचं खातं सुद्धा उघडलं नाही. खोटी राजनीती करतात ते अरविंद केजरीवाल यांना स्वतःची जागा निवडून आणता आली नाही. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना मतदारांनी उत्तर दिले आहे, असे नवनीत राणा यांनी म्हटले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला मोठा यश मिळाल्यानंतर मुंबईत कांदिवली पश्चिमेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या कार्यालय बाहेर मोठा जल्लोष केला जात आहे. कांदिवलीमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते एकमेकांना मिठाई भरवत आहेत. ढोल ताशाचा गजरत मोठा जल्लोष करत आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवा यांच्यावर टीका करत भ्रष्टाचार आणि दिल्लीकरांना धोका देणारा आप पक्षाला दिल्लीकरांनी जवाब दिला आहे, मोदीजींना दिल्लीकरांनी आशीर्वाद दिला आहे, असे पियुष गोयल यांनी म्हटले.
दिल्लीतील मालवीय नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सतीश उपाध्याय यांनी विजय मिळवला आहे. येथून सोमनाथ भारती यांना 2100 पेक्षा जास्त मतांनी पराभव पत्करावा लागला.
आता दिल्लीत भाजपचा विजय निश्चित असल्याने मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित होतो. साहिब सिंग वर्मा, वीरेंद्र सचदेवा, मनोज तिवारी यांची नावे शर्यतीत आहेत.
Delhi Election Result 2025 : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी अर्थात आप या पक्षाला जबर धक्का बसला आहे. येथील मतदारांनी दिल्लीतील आप पक्षाचं गेल्या 10 वर्षांतील साम्राज्य उलथवून लावलं आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "वारंवार खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करता येत नाही हे दिल्लीकरांनी दाखवून दिले आहे. दिल्लीतील या भव्य विजयासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचे मी अभिनंदन करतो."
संगम विहार विधानसभा मतदारसंघातून चंदन कुमार चौधरी विजयी झाले आहेत. त्याच वेळी आम आदमी पक्षाचे दिनेश मोहनिया यांना पराभवाचा सामना करावा लागला. येथे विजय आणि पराभवाचे अंतर फक्त 344 मतांचे होते.
कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार आतिशी विजयी झाल्या आहेत. येथून भाजपकडून रमेश बिधुरी आणि काँग्रेसकडून अलका लांबा निवडणूक रिंगणात होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला आहे.
आम आदमी पक्षाचे उमेदवार मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी ही जागा 1844 मतांनी जिंकली आहे.
दिल्लीत भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल. पुण्यात भाजपचा जल्लोष. राज्याचे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपचा पुण्यातील पक्ष कार्यालयाबाहेर जल्लोष. 27 वर्षानंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री बसणार. ढोल वाजवत भाजपकडून पुण्यात आनंदोत्सव
दिल्लीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव, 0.03 टक्के मतदान. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 23 जागा लढवल्या होत्या. सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोंडली मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत. कोंडली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे (आप) कुलदीप कुमार विजयी झाले आहेत. दरम्यान, भाजपच्या प्रियंका गौतम दुसऱ्या क्रमांकावर आल्या आहेत. दोन्ही ठिकाणी विजय आणि पराभवातील फरक 6293 मतांचा होता.
दिल्ली निवडणुकीत भाजप विजयाकडे वाटचाल करत आहे. दरम्यान, दिल्लीच्या रस्त्यांवर उत्सवाचे वातावरण आहे. भाजप कार्यकर्ते फटाके फोडत आहेत.
दिल्ली निवडणुकीची मतमोजणी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. भाजप बहुमताने विजयाकडे वाटचाल करत आहे आणि आम आदमी पक्ष खूप मागे आहे. दरम्यान, भाजपने एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये इंडिया गेटवर कमळ फुललेले दिसत आहे.
अरविंद केजरीवालांचे विचार, चारित्र्य शुद्ध नाही, म्हणूनच पराभव झाला. त्यांचे जीवन निष्कलंक नव्हते, मतदारांचा विश्वास नव्हता की हे आमच्यासाठी काही करतील. मी वारंवार सांगितलं मात्र त्यांनी ऐकलं नाही. दिल्लीत दारूच्या ठेक्यांच्या माध्यमातून जो आर्थिक घोटाळा झाला त्यामुळे ते बदनाम झाले. एकीकडे केजरीवाल लोकांच्या चारित्र्याबद्दल बोलतात मात्र दुसरीकडे दारू ठेक्यांमधे घोटाळे करतात, असं लोकांना वाटायला लागलं. - अण्णा हजारे, समाजसेवक
प्राथमिक कलानुसार, दिल्लीतील 70 जागांपैकी तब्बल 46 जागांवर भाजप आणि आम आदमी पक्ष (AAP) 24 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस पक्षाला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
आम आदमी पक्षाचे जवळजवळ सर्व मोठे चेहरे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. अरविंद केजरीवाल, सौरभ भारद्वाज, आतिशी, सोमनाथ भारती, सत्येंद्र जैन, अवध ओझा हे आपापल्या जागांवर भाजपपेक्षा मागे आहेत. मनीष सिसोदिया फक्त जंगपुरा मतदारसंघातून आघाडीवर आहेत, पण तिथेही चुरशीची लढत आहे.
घोंडा विधानसभा मतदारसंघात भाजपचे अजय महावार यांना 30340 मते मिळाली. त्याच वेळी, आपचे गौरव शर्मा यांना 16599 मते मिळाली आणि काँग्रेसचे भीष्म शर्मा यांना फक्त 1489 मते मिळाली.
दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. मतमोजणी अजूनही सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलं आहे की,जनता भाजपबरोबर आहे. देशाने यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदीजी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून स्वीकारला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनण्यापासून कोणी रोखू शकत नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
दुसऱ्या फेरीअखेर आम आदमी पक्षाचे मनिष सिसोदिया हे जंगपुरा मतदारसंघात आघाडीवर आहेत. मनिष सिसोदिया 2300 मतांनी आघाडीवर आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 'आप'च्या दिल्लीतील मक्तेदारीला शह दिल्याचे दिसत आहे. गेल्या महिनाभरात भाजपने विधानसभा निवडणुकीत कमबॅक केल्याचे दिसून आले. भाजपने दिल्लीत गेल्या महिनाभरात प्रचंड आक्रमक प्रचार केला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
दिल्लीत भाजपची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल. दिल्लीत भाजप 40, आप 30 जागांवर आघाडीवर. काँग्रेसला एकाही जागेवर आघाडीवर नाही.
दिल्ली विधानसभेच्या एकूण 42 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. यापैकी 20 मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार तब्बल 20 हजारांपेक्षच्या जास्त लीडने आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होऊन तब्बल साडेतीन तास उलटले आहेत. आतापर्यंतच्या कलानुसार, भाजपचे उमेदवार 42 जागांवर आघाडीवर आहेत. तर 27 जागांवर आम आदमी पक्ष आघाडीवर आहे. भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला.
दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. ओखला मतदारसंघात आम आदमी पक्षाच्या अमानतुल्लाह खान यांनी ओखला मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या अरीबा खान आणि भाजपचे मनीष चौधरी पिछाडीवर.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून तब्बल तीन तासांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदाच आघाडी घेतली आहे. ते नवी दिल्ली मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर भाजपच्या प्रवेश वर्मा आणि काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांचे आव्हान आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तीन तासांनी हाती आलेल्या कलांनुसार भाजप 46, आप 23 आणि काँग्रेस पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.
Delhi Assembly Election Results 2025: आपापसात लढण्याचा परिणाम
दिल्ली निवडणुक निकालावार काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे ट्विट
आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. कारण, 'आप'चे प्रमुख उमेदवार पिछाडीवर आहेत. यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही समावेश आहे. नवी दिल्ली मतदारसंघात अरविंद केजरीवाल पिछाडीवर पडले आहेत. या मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा आघाडीवर आहेत. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या दोन तासांनंतर पहिल्यांदाच आम आदमी पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे, भाजपला मागे टाकले. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार, भाजप 35, आप 34 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
Delhi Assembly Election Results 2025: रिठाला येथून भाजपचे कुलवंत राणा आघाडीवर
बल्लीमारनमधून आपचे इम्रान हुसेन पुढे.
ओखला येथून भाजपचे मनीष चौधरी यांनी आघाडी घेतली.
मोती नगरमधून भाजपचे सतीश खुराणा आघाडीवर.
ग्रेटर कैलाशमधून आप नेते सौरभ भारद्वाज यांनी आघाडी घेतली.
शकूर बस्ती येथून आपचे उमेदवार सत्येंद्र जैन आघाडीवर.
राजौरी गार्डनमधून भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा आघाडीवर आहेत.
करावल नगर मतदारसंघातून भाजपचे कपिल शर्मा आघाडीवर.
बिजवासन मतदारसंघातून भाजपचे कैलाश गेहलोत पुढे आहेत.
लक्ष्मी नगर मतदारसंघातून भाजप पुढे. बदरपूर मतदारसंघातून भाजपचे नारायण दत्त शर्मा पुढे.
रोहिणी मतदारसंघातून भाजपचे बिजेंद्र गुप्ता पुढे.
चांदणी चौकातून भाजपचे सतीश जैन यांच्या पुढे.
दिल्ली कॅन्टकडून भुवन तंवर पुढे.
ग्रेटर कैलासमधून आपचे सौरभ भारद्वाज आघाडीवर
मालवीय नगरमधून भाजपचे सतीश उपाध्याय पुढे.
बुराडीहून संजीव झा पुढे आहेत.
ग्रेटर कैलाश मतदारसंघातून सौरभ भारद्वाज पिछाडीवर आहेत.
Delhi Assembly Election Results 2025: करोल बाग मतदारसंघात भाजप उमेदवार आघाडीवर
करोल बागमधून भाजपचे दुष्यंत गौतम आघाडीवर.
सीलमपूरमधून आपचे उमेदवार झुबेर अहमद आघाडीवर आहेत.
जनकपुरीमधून आपचे उमेदवार प्रवीण कुमार आघाडीवर आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे दिल्लीहून मुंबईला परतले, दिल्लीत जाण्याचे कारण काय आणि कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे प्राथमिक कल हाती आले आहेत. मतमोजणीच्या आतापर्यंतच्या कलानुसार, भाजप 45, आम आदमी पक्ष 27 आणि काँग्रेस पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे. भाजपची बहुतमच्या दिशेने वाटचाल? दिल्लीत बहुमतासाठी 36 मॅजिक फिगर.
दिल्लीत मतमोजणीचे प्राथमिक कल हाती आले आहेत. पोस्टल मतांच्या मोजणीत भाजपने बाजी मारली. तर आता ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी सुरु झाली आहे. भाजप 42, आम आदमी पक्ष 23 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेस पक्षाला अवघ्या दोन जागांवर आघाडी मिळाली आहे. तर भाजप 31 आणि आप 22 जागांवर आघाडीवर. काँग्रेसमुळे आपला फटका बसणार?
दिल्लीतील मुस्लीमबहुल परिसर अशी ओळख असलेल्या बल्लीमारान, सीलमपूर या भागांमध्ये भाजपची मुसंडी. ओखला मतदारसंघातून भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 70 पैकी 53 जागांचे कल हाती आले आहेत. भाजपचे उमेदवार 33 जागांवर आघाडीवर. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार फक्त 18 जागी आघाडीवर. भाजप 27 वर्षांनी दिल्लीत सत्ता मिळवणार?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. पोस्टल मतांच्या मोजणीत भाजपची मोठी मुसंडी. भाजप 26 जागांवर आघाडीवर, आप 11 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर
आम आदमी पक्षाचे तीन बडे नेते पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर. आतिशी, मनिष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पिछाडीवर. भाजप पक्ष 15 जागांवर, तर आप 5 जागांवर आघाडीवर
दिल्लीत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा मतमोजणीच्या पोस्टल मतांची मोजणी सुरु. सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने मुसंडी मारली आहे. मतमोजणीच्या प्राथमिक कलानुसार, भाजपने 12 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्ष फक्त चार जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस अद्याप एकाही जागेवर आघाडीवर नाही.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा पहिला कल हाती आला आहे. यामध्ये भाजप आणि आप प्रत्येकी तीन जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेसला अद्याप खाते उघडता आलेले नाही.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पोस्टल मतांची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतांची मोजणी सुरु होईल. थोड्याचवेळात पहिला कल हाती येणार
दिल्लीचे निकाल २०२०
आप
६२
भाजप
८
काँग्रेस
०
इतर
०
दिल्लीचे निकाल २०१५
आप
६७
भाजप
३
काँग्रेस
०
इतर
०
दिल्लीचे निकाल २०१३
आप
२८
भाजप
३१
काँग्रेस
८
इतर
३
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने 5000 हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. शहरातील 27 केंद्रांवर मतमोजणी केली जाईल. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निमलष्करी दलांसह पुरेशा सुरक्षा उपाय योजना करण्यात आल्या आहेत. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात नोकरदारांचे 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले होते. याचा फायदा भाजपला दिल्ली होणार का, हे बघावे लागेल. दिल्लीतील मध्यमवर्ग भाजपच्या पाठिशी उभा राहणार?
दिल्लीत आम आदमी पक्ष हॅटट्रिक साधणार की 27 वर्षांनंतर भाजपचं पुनरागमन, आज होणार स्पष्ट. निकालापूर्वी केजरीवाल यांनी आपच्या सर्व उमेदवारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली, कथित ऑपरेशन लोटसला सामोरे जाण्याचा दिला मंत्र.
दिल्लीत सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. प्रथम पोस्टल मतांची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएम यंत्रामधील मतांची मोजणी सुरु होईल.
MATRIZE EXIT POLL : मॅट्रीजचा दिल्लीतील एक्झिट पोल
भाजप आणि आप यांच्यात चुरशीची लढत असणार आहे. या चुरशीच्या स्पर्धेत भाजप आपपेक्षा काहीशा अधिक जागा घेऊन सत्तेत येण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.
मतदानाची टक्केवारी कशी?
भाजप - 46% मते,
आप - 44% मते
भाजप - 35-40 जागा,
आप - 32-37 जागा-मॅट्रिझ
CHANAKYA STRATEGIES Exit Poll : चाणक्य स्ट्रॅटेजीजचा एक्झिट पोल
भाजप- 39-44 जागा
आप- 25-28 जागा
काँग्रेसला - 2-3 जागा
पोल डायरीचा एक्झिट पोल
भाजप - 42-50
AAP - 18-25
कांग्रेस - 0-2
मतांची टक्केवारी कशी?
भाजप - 45 %
AAP - 42 %
पीपल्स इनसाइटचा एक्झिट पोल
भाजप - 40-44 जागा
आप - 25-29 जागा
काँग्रेस - 0-1 जागा
P-Marq Exit Poll : पी मार्क एक्झिट पोल
भाजप - 39-49
AAP - 21-31
कांग्रेस - 0-1
WeePreside Exit Poll : वी प्रीसाईड एक्झिट पोल
भाजप - 46-52
AAP - 18-23
कांग्रेस - 0-1
मतांची टक्केवारी कशी?
भाजप - 49.2 %
AAP - 42.8 %
कांग्रेस - 5.1 %
भाजपला 39 ते 44 जागा मिळण्याची शक्यता, चाणक्यचा सर्व्हे समोर
चाणक्यच्या एक्सिट पोलनुसार, आम आदमी पक्षाला दिल्लीत 25 ते 28 जागांवर समाधान मानावे लागू शकते, तर दिल्लीत यावेळी भाजप मोठी मुसंडी मारेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. भारतीय जनता पक्षाला दिल्लीत 39 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज चाणक्यने व्यक्त केलाय. त्यामुळे भाजप दिल्लीत पहिल्यांदाच बहुमताचा आकडा मिळवेल, असे बोलले जात आहे. शिवाय, काँग्रेस सुद्धा दिल्लीत 2 ते 3 जागा मिळवू शकते.
जवळपास सर्वच एक्सिट पोलमध्ये आपला मोठा धक्का
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता एक्सिट पोल हाती येऊ लागले आहेत. या एक्सिटपोलमधून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला तगडा धक्का बसण्याची शक्यता आहे. चाणक्य शिवाय, मॅट्रिझ आणि पोल डायरीने देखील भाजपला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे 8 तारखेला दिल्ली विधानसभेच्या निकालावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 70 जागांचा निकाल आज जाहीर होणार आहे. यामध्ये कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
नवी दिल्ली विधानसभा
अरविंद केजरीवाल (आप)
संदीप दीक्षित (काँग्रेस)
प्रवेश वर्मा (भाजप)
कालकाजी मतदारसंघ-
आतिशी (आप)
अलका लांबा (काँग्रेस)
रमेश बिधूडी (भाजप)
जंगपुरा मतदारसंघ-
मनीष सिसोदिया (आप)
फरहाद सूरी (काँग्रेस)
तरविंदर सिंह मारवा (भाजप)
पटपडगंज मतदारसंघ-
अवध ओझा (आप)
अनिलकुमार चौधरी (काँग्रेस)
रवींद्रसिंह नेगी (भाजप)
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात
- मुख्यपृष्ठ
- निवडणूक
- Delhi Election Result 2025 Live : जनतेने दिलेला कौल मान्य, अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, पराभव मान्य!