Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार का? याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना प्रतिक्रिया दिली आहे. मी ज्योतिष नाही, राजकारणात काहीही होऊ शकतं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. त्यामुळं अजित पवार यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. एबीपी माझाच्या महाराष्ट्र माझा माझा व्हिजन या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, तुम्हाला वाटलं होतं का, काँग्रेस शिवसेना एकत्र येईल.
राजकारणात चढ उतार येत असतात. जमिनीवर पाय ठेवून काम करायचं असते असेही अजित पवार म्हणाले. यश मिळालं तरी हुराळून जायचं नसतं, अपयश आलं तरी खचून जायंच नसतं असेही अजित पवार म्हणाले. आमचं सरकार लोकाभिमुख कारभार करत असल्याचे अजित पवार म्हणाले. आमच्या अनेक योजना लोकप्रिय झाल्याचे अजित पवार म्हमाले. लाडकी बहिण योजना असेल, शेतकरी वीज माफी योजना असेल, दुधाचे अनुदान सात रुपये केले आहे या गोष्टी आम्ही केल्या आहेत. या गोष्टी करताना जात पात धर्म समोर ठेवला नसल्याचे अजित पवार म्हणाले. याबाबत आमच्यावर पोरकटपणाचे आरोप झाल्याचे अजित पवार म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मोठा फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बसला असल्याचे अजित पवार म्हणाले. प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यामध्ये लक्ष घातलं आहे. ते स्वत: याबाबत मार्ग काढत आहेत. त्यामध्ये काही मत मतांतरं आहेत.त्यातून योग्य मार्ग काढून पुढे जावू असे अजित पवार म्हणाले.
शरद पवारसाहेबांनी माझी नक्कल करणं हे वेदनादायी
शरद पवार साहेबांनी माझी नक्कल करणं अनेकांना आवडलेलं नसल्याचे अजित पवार म्हणाले. साहेबांनी माझी नक्कल करणं हे वेदनादायी असल्याचे ते म्हणाले. शरद पवार साहेबांना मी माझं दैवत मानलं पण त्यांनी माझी नक्कल केली. आजपर्यंत आम्ही राज ठाकरे नक्कल करत होते हे पाहत होतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: