India Air Defence: पाकिस्तानी सैन्याकडून शुक्रवारी रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हा हल्ला यशस्वीरित्या परतावून लावला होता. पाकिस्ताने शुक्रवारी भारतावर फतेह-1 (Fateh 1 missile) या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. त्यापैकी एक क्षेपणास्त्र दिल्लीवर सोडण्यात आले होते. परंतु, पाकिस्तानचे एकही क्षेपणास्त्र एअर डिफेन्स सिस्टीमने (Air Defence) भारतात पडून दिलेले नाही. यानंतर आता सीमारेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या (Pakistan Army) हालचालींना अचानक वेग आला आहे. श्रीनगरसह भारतीय सीमेलगत पाकिस्तानी सैन्यांची मोठी जमवाजमव सुरु आहे. त्यामुळे पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याची तयारी करत आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यही सावध झाले आहे. पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने गोळीबार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये एअर मिसाईल यंत्रणा अॅक्टिव्ह करण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून जमिनीवर हवेत क्षेपणास्त्रांचा मारा करता येतो. भारताकडून सीमारेषेवर पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्यु्त्तर दिले जात आहे. शुक्रवारी भारतीय सैन्याने तोफांचा मारा करुन पाकिस्तानी लष्कराचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे पाकिस्तानने सीमारेषेवर आणखी सैन्य जमा करायला सुरुवात केली आहे.
पंजाबमध्ये पाकिस्तानकडून हवाई हल्ल्याची शक्यता, सायरनचे आवाज
भारत आणि पाकिस्तान यांच्याकडून परस्परांवर क्षेपणास्त्रांचा मारा आणि ड्रोन हल्ले सुरु आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून शनिवारी अमृतसर परिसरात ड्रोन हल्ले केले जाण्याची शक्यता आहे. काहीवेळापूर्वीच अमृतसरमध्ये पाकिस्तानी ड्रोन्स दिसून आली आहेत. त्यामुळे अमृतसर प्रशासन रेड अलर्टवर आहे. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. फिरोजपूर, भटिंडा परिसरात सातत्याने सायरनेच आवाज ऐकू येत आहेत. पाकिस्तानी ड्रोनने अमृतसरमधील भारतीय लष्कराच्या छावणीवर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्ल्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. पाकिस्तानने काल भारतावर फतेह -1 ही सुपरसॉनिक क्षेपणास्त्रं डागली होती. मात्र, भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ही सर्व क्षेपणास्त्रे पाडली होती.
दरम्यान, भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानमधील चार हवाई तळ उद्ध्वस्त झाले आहेत. पाकिस्तानचा रहीम यार एअर बेसची धावपट्टी नष्ट झाली आहे. उर्वरित तीन हवाई तळांचे मोठे नुकसान झाले आहे.
आणखी वाचा
पाकिस्तानच्या गोळीबारात आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही हादरले!
भारताची लढाऊ विमानं पाकिस्तानमध्ये घुसली, तीन हवाई तळांवर तुफान हल्ला, मोठं नुकसान