Maharashtra Assembly Elections 2024 नागपूर :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज (दि.25) दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 45 उमेदवार जाहीर केले आहेत. 


दरम्यान, या काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्यायादीत विदर्भातील काही महत्त्वपूर्ण जागांचा देखील समावेश आहे. त्यात आता दक्षिण नागपूरचा सस्पेन्स संपला असून या मतदारसंघातून  काँग्रेसचे नेते गिरीश पांडव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे आता भाजपाचे नेते मोहन मते विरुद्ध  काँग्रेसचे गिरीश पांडव अशी लढत रंगणार आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध काँग्रेसने सुरेश भोयर यांना उमेदवारी देत त्यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे कामठीत आता भोयर विरुद्ध  बावनकुळे असा सामना रंगणार आहे. तर नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथून काँग्रेसनेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी जाहीरी करण्यात आली आहे. असे असले तरी विदर्भातील ज्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच बघायला मिळाले आहे, त्या रामटेक मतदारसंघाचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. त्यामुळे ही जागा मविआत आता कोणाला सुटते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


रामटेकच्या जागेवरुन मविआत पुन्हा घमासान?  


रामटेकच्या जागे बद्दल पुन्हा एकदा सुनील केदार आणि राजेंद्र मुळक यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा केलीय. शिवसेना ठाकरे गटाने पहिल्याच यादीत रामटेके जागेवर  विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच त्यांना एबी फॉर्म सुद्धा दिला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या रामटेकच्या उमेदवारीबद्दल महाविकास आघाडीमध्ये विचार केला जावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मुद्यावरून आज सुनील केदार आणि  उद्धव ठाकरे यांच्यामध्ये साधारणपणे एक अर्धा तास बैठक चालली. विदर्भातील ज्या काही मोजक्या जागांवर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये  तिढा आहे.


काँग्रेसच्या 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहिर


भुसावळ - राजेश मानवतकर
जळगाव - स्वाती वाकेकर
अकोट - महेश गणगणे
वर्धा - शेखऱ शेंडे
सावनेर - अनुजा केदार
नागपूर दक्षिण - गिरिश पांडव
कामठी - सुरेश भोयर
भंडारा - पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव - दिलिप बनसोड
आमगाव - राजकुमार पुरम
राळेगाव - वसंत पुरके
यवतमाळ - अनिल मांगुलकर
आर्णी - जितेंद्र मोघे
उमरखेड - साहेबराव कांबळे
जालना - कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप - यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील


 हे ही वाचा