Eknath Shinde : माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान सावत्र दृष्ट भावांनी केला आहे. लाडकी बहिण योजना बंद पाडण्यासाठी विरोध कोर्टामध्ये गेले होते, पण कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये बोलून दाखवला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांना इशारा दिला. पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, एकनाथ शिंदेला हलक्यात घेतल्याने टांगा पलटी झाला असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना लगावला.
हे दुतोंडी साप आहेत, जरा जनाची नाहीतर मनाची लाज ठेवा
एकनाथ शिंदे म्हणाले की हे दुतोंडी साप आहेत. जरा जनाची नाहीतर मनाची लाज ठेवा. सर्वच लोक माझे लाडके असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या भावांसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी मला जेलमध्ये जावं लागलं तर मी जायला तयार आहे. विरोधकांचे सरकार येण्याचे दरवाजे बंद झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. ते म्हणाले की हे दुतोंडी साप आहेत. यांनी महिलांचा अपमान केला आहे, यांना महिला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत.
त्यांनी सांगितले की मोदींकडे पैसे मागता आणि नंतर म्हणतात देत नाही म्हणता. ते म्हणाले की विरोधक बोंबाबोंब करत होते. बेरोजगांसाठी तुम्ही काय केलं म्हणून. पण 25 लाख रोजगार निर्मितीचा निर्णय आम्ही घेतल्याचे ते म्हणाले. शिंदे यांनी राज्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले. राज्यात कोठूनही कोठे जायचं असेल तर सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये. पालघर कोस्टलमार्फत जोडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पालघरला एअरपोर्ट करत आहोत. राज्याचा सर्वांगीण विकास करणार असून पालघर आता ग्रामीण पालघर राहणार नाही, महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सलग दोन दिवस बॅगा चेक करण्यात आल्यानंतर त्यांनी टिकीची झोड उठवली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याांची बॅग तपासली. यावरून बोलताना माझ्याकडे युरीन पाॅट नव्हतं, माझी बॅग चेक केली होती. कर नाही तर डर कशाला अशी टीका त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या