मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाकडून सध्या बड्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासणीचं काम सुरू आहे. थेट हेलिपॅडवरच निवडणूक आयोगाचे कर्मचारी बॅगा तपासतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यवतमाळमधील वणी मतदारसंघात आणि लातूरच्या औसा मतदारसंघातील सभेसाठी जात असताना त्यांच्या बॅगा तपासण्याचा आल्याचा व्हिडिओ स्वत: शूट केला होता. तसेच, ज्याप्रमाणे माझ्या बॅगा तपासल्या तशाच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासा. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बॅगा तपासल्याचे व्हिडिओही मला पाठवा, असेही त्यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या व्हिडिओनंतर आता पालघर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याही बॅगांची झाडाझडती घेण्यात आली आहे. यावेळी, मुख्यमंत्र्‍यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.  

Continues below advertisement


महायुती उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पालघरमध्ये जाहीर सभा घेण्यात आली. या सभेपूर्वी पालघर येथील पोलीस मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हॅलिकॉप्टर येताच, निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची झाडाझडती घेतली. यावेळी, मुख्यमंत्र्‍यांनी झाडाझडती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्देशून उद्धव ठाकरेंना टोला लगावला.ह्या बॅगेत काहीही नाही, बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही, असा टोला मुख्यमंत्र्‍यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. तसेच, इलेक्शन कमिशन त्यांचं काम करतय. त्यांच्यावर राग कशाला काढता, लाडक्या बहीण योजनेमुळे हे बिथरले आहेत, त्यामुळे ते कोणावरही आरोप करत सुटल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.


वणी येथे उद्धव ठाकरेंची बॅग तपासणी


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचारसभा घेतेवेळी निवडणूक कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या, त्यावरुन संताप व्यक्त केला होता. तसेच, नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोलाही लगावला होता. बॅगच काय युरीन पॉट पण तपासा, असे म्हणत वणी येथील निवडणूक कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी शूट केला होता. त्यावरुनच, आता मुख्यमंत्र्‍यांनी पलटवार केला आहे. ह्या बॅगेत काहीही नाही, बॅगेत कपडे आहेत, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 



बॅगा तपासल्याचा व्हिडिओ मला पाठवा


उद्धव ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना म्हणाले, माझी बॅग तपासत आहात, बरोबर आहे. माझ्या अगोदर तुम्ही कोणाची बॅग तपासली? माझा इथे पहिला दौरा आहे. पण माझ्या दौऱ्यापूर्वी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तुम्ही तपासली आहे. तुम्ही चार महिन्यात एकाचीही नाही तपासली म्हणत आहात. मीच तुम्हाला पहिल्यांदा सापडलो. माझी बॅग तपासा मी तुम्हाला अडवत नाही. आतापर्यंत तुम्ही मिधेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीसची बॅग तपासली का? मोदी आणि अमित शाहांची बॅग तपासली का? त्यांनी इथं आले तर त्यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ मला पाठवायचा आहे


हेही वाचा


मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'