Sharad Pawar : आता विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) सत्ता बदल करण्यासाठी प्रयत्न करा असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. महाराष्ट्र राज्य शेती प्रधान राज्य आहे. पण या सरकारच्या काळात महाराष्ट्रमध्ये 900 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे शरद पवार म्हणाले. डोक्यावर कर्ज झाले, सावकारी वाढली त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे पवार म्हणाले. साधी गोष्ट आहे, तुमच्या भागात कांदा पीक येते, पण दोन पैसे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे ही भावना आहे. कांद्याची निर्यात केली तर पैसे वाढतात असे पवार म्हणाले. मी मंत्री असताना शरद पवार होश मे आवो, पॅज किमते कम करो च्या घोषणा दिल्या होत्या. कांद्याच्या माळा घालून आंदोलन केली होती. मी सांगितलं कांद्याच्या माळा घाला नाहीतर काहीही करा, कांदा दर कमी होऊ देणार नाही असे पवार म्हणाले. ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये बोलत होते.  


 इंडिया आघाडीने लोकांना जागृत करण्याचे काम केले


महिला अत्याचाराच्या मुद्यावरुन देखील शरद पवारांनी सरकारवर टीका केली. मागील सहा महिन्यात शेकडो मुली गायब झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील दोन लहान मुलींवर अत्याचार झाले असल्याचे शरद पवार म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र सध्या सत्तेचा गैरवापर केला जात असल्याची टीका शरद पवार यांनी केली. महाराष्ट्राची स्थिती बदलत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सर्व महाराष्ट्रमध्ये 2 जागा राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आम्ही कष्ट केले, संघर्ष करत नवीन आघडी स्थापन केली. दिल्लीत सर्व नेत्यांनी इंडिया आघडी तयार केली. अरविंद केजरीवाल, सोनिया गांधी, राहूल गांधी, आम्ही सर्वांनी मिळून बैठक घेतली. देशात लोकशाही आहे की नाही अशी परिस्थिती होती. मात्र, देश वाचविण्यासाठी इंडिया आघाडीने लोकांना जागृत करण्याचे काम केले. यामुळं राज्यात मागील वेळी ज्यांना 5 जागा मिळाल्या त्याच महाराष्ट्रमध्ये लोकसभेला 31 जागा मिळाल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. 


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे, सर्वच राजकीय पक्षांचे दौरे, संवाद, बैठका सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील राज्यभर प्रचार दौरे करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


Sharad Pawar : राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे दोन तीन लोक होते, त्यांनी पक्ष फोडला, शरद पवारांचं परळीत वक्तव्य, नेमका रोख कुणाकडे?