नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि त्यांचा पुतण्या अजित पवारांविरुद्ध चांगलाच शड्डू ठोकला आहे. अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर शरद पवार (Sharad pawar) प्रचारसभांच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल करत आहेत. शरद पवारांचे निकटवर्तीय आणि जवळचे मानले जाणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांची साथ सोडून अजित पवारांसोबत सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून येवला मतदारसंघात उमेदवार देण्यात आला आहे. येथील मतदारसंघात आज शरद पवारांची सभा होत असून त्यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आजची सभा ऐतिहासिक सभा आहे, माणिकराव शिंदें यांनी लोकांची सेवा केली आहे. मागे मी आलो असता, मी जाहीर सांगितले होते की आमच्याकडून चूक झाली असे म्हण शरद पवारांनी येवलेकरांना साद घातली. 

Continues below advertisement


महाराष्ट्राच्या विधानसभा, विधानपरिषदेत संधी दिली, विरोधी पक्षनेते पद दिले. पण, त्यांनी काही उद्योग केले, त्यांना पद सोडवं लागलं, तुरुंगात गेले, त्यांना भेटायला कोणी जात नव्हते. माझी मुलगी, आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्यांना पुन्हा संधी दिली, तुम्ही त्यांना निवडून दिले असे म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांवर थेट हल्लाबोल केला. मुबंईतील शिवाजी पार्कवर संमेलन घेतले होते, त्याचे अध्यक्षपद भुजबळ यांना दिले. उपमुख्यमंत्री पद दिले, त्यानंतर ते आणखी उद्योग करत होते, त्याचा परिणाम सरकारवर झाल्याचेही शरद पवारांनी म्हटले.  


भुजबळांनी मर्यादा शिल्लक ठेवल्या नाहीत


आमच्या सहकाऱ्याने पक्ष फोडला, तेव्हा भुजबळ सकाळी आले, जे झालं ते वाईट झालं, समजूत काढायला जाऊ का असं मला विचारलं. भुजबळ साहेब गेले ते परत आलेच नाही, आणि दुसऱ्या दिवशी शपथच घेतली, असे म्हणत भुजबळांवर जोरदार हल्लाोबल केला. एखाद्या माणसानं चुकीचे काम करताना काही मर्यादा असतात, त्या भुजबळ यांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, अशा लोकांना पुन्हा निवडुन द्यायचं नाही हा विचार तुम्ही करायचा आहे. मी याआधी इथे आलो होतो,  तुम्ही या ठिकाणी परिवर्तन करणार आहात, इथे अनेक लोक इथे आले आहेत, ज्यांनी नेतृत्वाला फसवले असे म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळ आणि अजित पवारांना लक्ष्य केले. तसेच, येवलेकरांना भावनिक सादही घातली. मी पूर्ण ताकदीने तुमच्या मागे उभे राहिलो, मला आनंद आहे, प्रचंड प्रतिसाद तुम्ही दिला. ही लढाई आपण प्रचंड मतांनी जिंकू जिंकू जिंकू, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला. 


हेही वाचा


आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले