Pravin Tarde : दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी नुकताच त्यांचा 50 वा वाढदिवस साजरा केला. त्यानिमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि दिग्दर्शक विजू माने (Viju Mane) यांच्या हटके प्रतिक्रियेने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्त कुशलने एक खास कविता केली होती. त्या कवितेवर विजू माने चांगलेच वैतागले. इतकच नव्हे तर कुशल बद्रीकेने प्रवीण तरडेंसाठी 50 कविता केल्याचं यावेळी त्याने सांगतलं.त्यावरही विजू माने चांगलेच संतापले. हा मिश्किल व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
विजू माने आणि कुशल बद्रिकेने दिल्या खास शुभेच्छा
विजू माने आणि कुशल बद्रिकेने प्रवीण तरडेंना शुभेच्छा देताना म्हटलं की, प्रवीण मित्रा आज तुझा 50 वा वाढदिवस..खरं तर तू इतक्या प्रेमाने इतक्या वेळा बोलावलं होतंस..जवळपास 50 वेळा तू आमंत्रण दिलं होतंस..पण काही कारणामुळे मला यायला जमत नाहीये. तेव्हा आज तुझ्या या 50व्या वाढदिवसानिमित्त मला विशेष शुभेच्छा द्यायच्या आहेत.
त्यावर कुशलने त्याची कविता सादर केली. मुळशी पॅटर्नचा तू डिरेक्टर, पांडू मधला अॅक्टर;तुझा पिक्चर धर्मवीर,तुझा पिक्चर धर्मवीर 2 ,हॅप्पी बर्थडे यू टू कुशलची ही कविता ऐकून विजू माने वैतागले. त्यांनी म्हटलं की, सॉरी प्रवीण मी खरंतर मी तुला तुझे छान पोर्टेट 50 व्या वाढदिवसानिमित्त भेट देणार होतो. ते विशेष होतं.. ह्याने हे काय सुरु केलं काय माहित..त्यावर कुशल म्हणतो की, म्हणजे 50 कविता नाही... विजू माने त्याला म्हणतात,अरे कशाबद्दल... 50 वर्ष झाली ना दादा...मग आपल्या कविता नको का 50 असं कुशल म्हणतो आणि त्यांना दुसरी कविता ऐकवतो. अरे जाग मनुजा जाग, आरारा खतरनाक...
कुशल आणि विजू माने यांच्या या हटके शुभेच्छांमुळे सोशल मीडियावर एकच हाशा पिकला आहे. तसेच हा व्हिडीओ देखील बराच व्हायरल होतोय. यावर अनेकांनी हासण्याचे इमोजीही कमेंट केले आहेत.