नवी दिल्ली : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर सत्ताधारी भाजप आज पहिली यादी जाहीर करणार आहे. भाजपच्या संसदीय समितीची बैठक आज दुपारी चार वाजता पक्षाच्या मुख्यालयात होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीनंतर पहिल्या यादीतील 100 उमेदवारांची घोषणा होईल.

लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात

पहिल्या टप्प्यातील उमेदवार जाहीर होणार?
पहिल्या यादीत पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटकसह उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या जागांचा समावेश आहे. वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार असल्याची औपचारिक घोषणाही आज होऊ शकते. 2014 मध्ये मोदींनी वाराणसीमधूनच निवडणूक लढवली होती आणि पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील 91 जागांवर मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर

भाजपच्या पहिल्या यादीत आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या 42 जागांसह पश्चिम यूपी, बिहार, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओदिशा आणि महाराष्ट्रातील जागांचा समावेश असू शकतो. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या सगळ्या जागांवर पहिल्याच टप्प्यात मतदान होणार आहे. तर इतर राज्यांच्या काही जागांवर पहिल्या टप्प्यातही मतदान होणार आहे. देशातील 543 लोकसभा जागांवर 7 टप्प्यात मतदान होणार असून 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्रातील उमेदवारांचीही घोषणा?
दुसरीकडे शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर राज्यात एकूण 25 जागांवर भाजपचे उमेदवार लढणार आहेत. त्यापैकी 17 ते 18 नावं पहिल्या यादीत जाहीर होणार तर उर्वरित जागांवर अजूनही खल सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात भाजपकडून 5 ते 6 जागांवर उमेदवार बदलण्याचा विचार सुरु असल्याचेही समोर आलं आहे. यामध्ये सोलापूर, दिंडोरी, गडचिरोली-चिमूर, माढा, नांदेड आणि अर्थात अहमदनगर दक्षिण या जागांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार

लोकसभेसाठी शिवसेनेचे महाराष्ट्रातील संभाव्य 23 उमेदवार

VIDEO | उत्तर महाराष्ट्र, सोलापुरातले नेते भाजपच्या संपर्कात : चंद्रकांत पाटील