मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजपची (BJP) 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, वर्सोवातून पुन्हा एकदा भारती लव्हेकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. लातूर शहरमधून अर्चना पाटील चाकूरकर तर चंद्रपूर किशोर जोरगेवार यांना भाजपने संधी दिली आहे. विशेष म्हणजे किशोर जोगरेवार यांनी एकच दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यानंतर 22 उमेदवांची दुसरी यादी जाहीर केली. आता, भाजपने 25 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे, भाजपने 146 उमेदवारांना आत्तापर्यंत मैदानात उतरवल्याचं दिसून आलं. तिसऱ्या यादीत विदर्भातील (Vidarbha) 25 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलीय. 


भाजपच्या तिसऱ्या यादीत आमदार राम सातपुते यांच्या नावाचा समावेश आहे. भाजपने माळशिरस विधानसभामधून पून्हा एकदा राम सातपुतेंनाच संधी दिली आहे. शरद पवार गटाच्या उत्तम जानकरांसोबत त्यांची लढत होणार आहे. डहाणू विधानसभेसाठी महायुतीकडून भाजपचे विनोद मेढा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विनोद मेढा भाजपचे तलासरी तालुका अध्यक्ष  असून श्रीनिवास वनगा यांना महायुतीने उमेदवारी टाळली. बंडात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या निष्ठावान श्रीनिवास वनगा यांना अखेर डावलण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.  तर, वसईतून स्नेहा दुबे यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. स्नेहा दुबे या श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडीत यांच्या कन्या आणि नालासोपारा शिवसेना शिंदे गटाचे पालघर लोकसभा समन्वय नवीन दुबे यांच्या पत्नी आहेत.






आशिष देशमुख यांची सावनेर मधून उमेदवारी जाहीर झाल्या नंतर मै हू डॉन! ची रील व्हायरल झालं आहे. सुनील केदार यांच्या झुंडशाहीला उत्तर देण्यासाठी भाजपने आशिष देशमुख यांना सावनेरच्या मैदानात उतरवल्याची चर्चा आहे. आशिष देशमुख यांचे तिकीट निश्चित झाल्यानंतर आशिष देशमुखांना वायप्लस दर्जाची सेक्युरिटी मिळाली आहे. त्यामुळे, सावनेरमध्ये पाहायला मिळणार केदार विरुद्ध देशमुख पारंपरिक लढत होणार आहे. 


साकोलीतून अविनाश ब्राह्मणकर 
सावनेरमधून आशिष देशमुख 


आर्वीतून विद्यमान आमदारांचं तिकीट कापत सुमित वानखेडे यांना उमेदवारी जाहीर