Chitra Wagh On Nitin Raut: काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्या एका व्हिडीओची सध्या चर्चा रंगली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी नितीन राऊत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जय भीम म्हटलं म्हणून विलासराव देशमुख यांनी मंत्री केलं नाही, असं नितीन राऊत बोलताना दिसत आहे.
चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या?
काँग्रेसची संस्कृती नेहमीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी राहिलेली आहे. एका भाषणामध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत सांगतात, की केवळ 'जय भीम' म्हटले म्हणून विलासराव देशमुखांनी मंत्री केले नाही. अहो, नितीन राऊतजी यात नवीन काय आहे ? प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेसवाल्यांनी दोनदा निवडणुकीमध्ये पाडले, त्यांच्याकडून कसली अपेक्षा करता? यांचा मूळ चेहरा आरक्षणविरोधी, मागासवर्गीयांच्या विरोधी आणि फक्त मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा आहे, त्यांच्याकडून तुम्हालाच काय भारतात कोणालाच न्याय मिळणार नाही. पूर्वीपासून हीच आहे काँग्रेसची संस्कृती...अशी टीका चित्रा वाघ यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.
नितीन देशमुख दुसऱ्यांदा रिंगणात-
सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगलाच टिपेला पोहोचलाय. अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघाच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार नितीन देशमुख यांना परत दुसऱ्यांदा रिंगणात उतरवण्यात आलंय. राज्यात शिवसेनेतील बंडानंतर शिंदेंच्या खेम्यात गेलेले आमदार नितीन देशमुख गुवाहाटीवरून परत ठाकरेंच्या शिवसेनेत आले होतेय. त्यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने गंभीर आरोप केले होतेय. याच पार्श्वभूमीवर बाळापूर विधानसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेकडून बळीराम सिरस्कार तर वंचितकडून सय्यद नातिकोद्दीन खतीब हे दोन माजी आमदार रिंगणात आहेत. आमदार नितीन देशमुख यांनी सध्या प्रचाराचा चांगलाच धडाका लावलाय. सकाळी नऊ वाजतापासून त्यांच्या प्रचाराला सुरुवात होतेय. गावांमध्ये पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी, मंदिरांना भेटी आणि छोट्या कॉर्नर सभा असा त्यांच्या प्रचाराचं स्वरुप आहे.
बाळापूर मतदारसंघात 2019 मध्ये प्रमुख तीन उमेदवारांना मिळालेली मते :
शिवसेनेचे (आता उबाठा) नितीन देशमुख 18,788 मतांनी विजयी
उमेदवार पक्ष मते
नितीन देशमुख शिवसेना 69343
डॉ. धैर्यवर्धन पुंडकर वंचित 50555
डॉ. रहेमान खान एमआयएम 44507
संबंधित बातमी:
Uddhav Thackeray: भाषण संपताच स्टेज खचला; उद्धव ठाकरे कडेकडेनं उतरले, ठाण्यात नेमकं काय घडलं?, Video