Uddhav Thackeray Thane: गचके खात खात तुमच्यापर्यंत पोहचलो. कुठेही भाषण करायची गरज नाही. मी ठाण्यात आलोय कारण गद्दारीचा केंद्रबिंदू इथे आहे. त्या गद्दाराच्या बुडाला मशाल लावायची आहे. ठाण्याला गद्दारीचा कलंक लागला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. ठाणे विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे ठाण्यात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर हल्लाबोल केला. 


उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर स्टेजचा काही भाग खचला-


उद्धव ठाकरे यांचे भाषण झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांसोबत भेटत असताना स्टेजचा काही भाग अचनाक खचला. ज्यावेळेस स्टेजचा भाग खचला त्यावेळेस उद्धव ठाकरे स्टेजवर उपस्थित होते.  उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी स्टेजवर झाली असल्याने स्टेजचा काही भाग खचल्याचे समोर आले.  मात्र ताबडतोब प्रसंगावधान राखून स्टेजवरील उद्धव ठाकरे आणि इतर लोकांना खाली उतरवण्यात आले. यावेळी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. 


उद्धव ठाकरेंचा मनसेवरही हल्लाबोल-


गुजरातला हे लोक ढोकळा खायला गेले. ठाण्यातली मिसाळ खायची ना...काही लोकांना खूप आवडते मिसळ खायला.  मागच्यावेळी बिनशर्ट पाठिंबा दिला. आता इनशर्ट पाठींबा दिला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली. तसेच मला विचारतात एक जागा का सोडली नाही?, मी का सोडू, यांना लुटायला सोडायची का?, कोणत्याही लुटणाऱ्या लोकांना जागा सोडणार नाही.. असं विधानही उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेच्या जागेवरुन केला.  या ठिकाणी तुम्ही मत आता दुसऱ्यांना दिला तर आता आपलं खरं नाही. आपण गुनसेला मत देणार का?, गुजरात नवनिर्माण सेना...आता मनसे नाही राहिली, गुनसे झाली, असं उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.


उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद


राज ठाकरेंनी नाशिकमधील जाहीर सभेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्र हिताच्या गोष्टी असत्या तर समजले असते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत महाराष्ट्र हिताच्या गोष्टी सांगितल्या. उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्री पद नको म्हटलं असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


ठाण्याच्या सभेनंतर स्टेज खचला, उद्धव ठाकरे कडेकडेनं उतरले, Video: