ठाणे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने (BJP) महायुतीच्या विजयाचा शुभारंभ केला. येथील प्रभाग क्र. 18 मधून रेखाताई चौधरी आणि प्रभाग क्र.26-क मधून आसावरीताई केदार नवरे यांची नगरसेविकपदी बिनविरोध निवड झाली. या विजयानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी दोन्हीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. यावेळी, चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन दोन्ही महिला उमेदवारांचे बोलणे करुन दिले. त्यामुळे, मुख्यमंत्री फडणवीस यांनीही दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले. आता, केडीएमसी (KDMC) महापालिकेत तिसरा उमेदवार विजयी झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपने हॅट्रिक केली असून तिसरा उमेदवार बिनविरोध विजयी झाला. 

Continues below advertisement

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 26 ब मधून भाजपच्या रंजना मीतेश पेणकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे, भाजपने येथील महापालिकेत विजयाची हॅट्रिक केली असून स्वबळावरील विजयासाठी किंवा सत्ता स्थापनेसाठी भाजप केवळ 57 जागा दूर आहे. 122 जागा असलेल्या केडीएमसी महापालिकेत भाजपा 65 आणि शिवसेना 57 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, भाजप शिवसेना युतीच्या एकूण 122 जागांपैकी भाजपने तीन जागा जिंकत आघाडी घेतली आहे. भाजपा महायुतीला येथील विजयासाठी, सत्ता स्थापनेसाठी 61  जिंकाव्या लॉगतील.  

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीचा गड राखल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या प्रभागातही भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. डोंबिवली विधानसभेमधील स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागात भाजपचा तिसरा विजय झाला आहे. या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून पहिल्यांदा रविंद्र चव्हाण निवडून आले होते, हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच प्रभाग 26 ब मध्ये भाजपच्या बालेकिल्यामध्ये रंजना मितेश पेणकर यांची बिनविरोध निवड झाल्याने भाजप समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे यांच्यानंतर आता रंजना पेणकर बिनविरोध विजयी झाल्याने भाजपने केडीएमसी महापालिकेत तिसरा विजय मिळवला आहे. 

Continues below advertisement

केडीएमसीमध्ये 2015 पासून निवडणूकच नाही

केडीएमसी महापालिकेची यापूर्वीची निवडणूक 2015 मध्ये झाली होती, तिचा पंचवार्षिक कालावधी 2020 मध्ये संपूष्टात आला. त्यावेळी कोरोना महामारी होती. कोरोनामुळे महापालिकेची निवडणूक पार पडली नाही. त्यामुळे, 2020 पासून महापालिकेत प्रशासकीय राजवट होती. आता, निवडणुकीमुळे येथील प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे. 

एकूण वॉर्ड - 31

चार सदस्यांचे वॉर्ड- 29

तीन सदस्याचे वॉर्ड- 2

एकूण सदस्य संख्या- 122

KDMC Election : महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल कसं?शिवसेना (एकत्रित) - 53

भाजप- 43

काँग्रेस -4

राष्ट्रवादी-2

मनसे- 9

बसपा- 1

एमआयएम- 1

अपक्ष- 9

हेही वाचा

आदित्य ठाकरेंना दे धक्का, निकटवर्तीयाने भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात युतीला आव्हान