Malti chahar: भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहिण आणि अभिनेत्री मालती चहर बिग बॉस 19 मुळे घराघरात पोहोचली. या स्पर्धेत तिचं नाव चांगलंच चर्चेत होतं. घरातून बाहेर पडल्यानंतरही मालती चर्चेत आहे. बिग बॉसमध्ये असताना मालती आणि प्रणिताच्या स्पेशल बॉण्डची चांगलीच चर्चा झाली. आता  ती प्रसिद्ध गायक अमल मलिकला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. डेटिंगच्या या अफवांवर मालतीने प्रतिक्रिया दिली असून या चर्चांना तिने पूर्णविराम दिलाय. बिग बॉसच्या घरात मालती आणि अमाल या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण नातं दिसलं. मालती आणि अमाल यांच्या  नात्याला चाहत्यांनी प्रेमाचं नाव दिलं. सोशल मीडियावर सगळीकडे मीन्स फोटो दिसत असताना मालतीने सोशल मीडियावर पोस्ट करत अमाल सोबत कधीही प्रेमसंबंध नसल्याचा स्पष्ट केलं आहे. 

Continues below advertisement

काय म्हटलं मालती चाहरने?

मालतीने अमाल मलिक यांच्याशी सुरू असलेल्या अफेअरच्या चर्चांवर पूर्णविराम देत एक पोस्ट केली आहे. यात तिने म्हटलं," आता हे सगळे एकदाच संपवते. अमाल आणि माझ्यात कुठल्याही प्रकारचं नातं नव्हतं. त्याने माझा नंबर घेतला होता आणि आम्ही एकदा भेटलो. आम्ही गप्पा मारल्या आणि वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी एकमेकांना शेअर केल्या. त्यानंतर आम्ही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात आहोत. एवढंच! आमच्यात यापेक्षा जास्त काहीही नव्हतं." अशी पोस्ट मालतीने केली आहे. 

 

Continues below advertisement

शो मध्ये जेव्हा' बाहर की बात नही करेंगे सब म्हणाले होते तेव्हा मला म्हणायचं होतं की मी त्याची वैयक्तिक माहिती शेअर करणार नाही. शोमध्ये मी त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझ्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्याचा प्रयत्न करत आहे असे सुचित करणारे एक नॅरेटिव्ह सेट करणं हा अमालचा अनादर होता. आणि हे सगळं मी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर पाहिले. 

हो तो माझ्याजवळ मानसिक आरोग्यविषयी बोलला होता. मी सहानुभूती व्यक्त केली आणि नंतर त्याला अधिक पश्चाताप होऊ नये म्हणून त्या क्षणी मी त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला. पण आता मलाच याचा पश्चाताप होत आहे.  एवढंच! मला यातून मोकळं करा. माझं नाव कृपया त्याच्याशी जोडू नका. धन्यवाद." अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.