Bhokardan Assembly Election 2024 : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidan Sabha Election Result 2024) वातावरण आहे. जो-तो या निवडणुकीचीच चर्चा करताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील जालना हा जिल्हा अनेक कारणांमुळे चर्चेत आलेला आहे. या निवडणुकीतही हा जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. याच जिल्ह्यातील भोकरदन हा विधानसभा मतदारसंघ अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. या मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. कारण या दिवशी थेट दोन बड्या नेत्यांत लढत होणार आहे.
कोण-कोणात होणार लढत?
भोकरदन या मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत दानवे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.म्हणूनच इथे संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे अशी थेट लढत होणार आहे.
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं होतं? (Bhokardan Assembly Election 2029 Result)
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने माजी केंद्रीय मंत्री अंबादास दानवे यांचे सुपुत्र संतोष दानवे यांना तिकीट दिले होते. तर राष्ट्रवादी (अविभाजित) पक्षाकडून तेव्हा चंद्रकांत दानवे यांनीच निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत संतोष दानवे यांनी बाजी मारली होती. त्यांना एकूण 118539 मते मिळाली होती. तर चंद्रकांत दानवे यांना एकूण 86049 मते मिळाली होती. संतोष दानवे यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 54.6 टक्के होते. तर चंद्रकांत दानवे यांना मिळालेल्या जागांचे प्रमाण 39.7 टक्के होते. या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर दीपक बोऱ्हाडे हे होते. त्यांना एकूण 8298 मते मिळाली होती. त्यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 3.8 टक्के होते.
2014 सालच्या निवडणुकीत काय घडले होते?
2014 सालच्या निवडणुकीतही संतोष दानवे आणि चंद्रकांत दानवे यांच्यातच लढत झाली होती. या निवडणुकीतही संतोष दानवे यांनी बाजी मारली होती. त्यांना 35.12 टक्के मतं पडली होती. तर चंद्रकांत दानवे यांना 31.71 टक्के मतं मिळाली होती.
दरम्यान, यावेळी ओबीसी आरक्षण तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे जालना जिल्ह्यातील राजकारण बदललेले आहे. त्यामुळे यावेळी भोकरदन मतदारसंघात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
Jalna Candidate List : जालन्यातील बदनापूरमध्ये कोण मारणार बाजी? महायुती ठरणार सरस की मविआ जिंकणार?