Bhandara District Vidhan Sabha Election 2024 : गोंदिया विधासभा क्षेत्रातील साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोलेंनी (Nana Patole) बाजी मारली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी अखेर भाजपचे (BJP) अविनाश ब्राह्मणकरांवर 529 विजय यांनी विजय मिळविला. गोंदिया (Bhandara Assembly Election 2024) हा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला आहे. त्यामुळे भंडाऱ्याची ओळख देश पातळीवरच्या राजकारणात आहे. भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा क्षेत्र तर गोंदिया जिल्ह्यात चार विधानसभा क्षेत्र आहेत. त्यातच नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून रिंगणात आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचीही उत्सुकता आहे.

 

मतदारसंघ महायुती महाविकास आघाडी अपक्ष विजयी
भंडारा नरेंद्र भोंडेकर पूजा ठावकर अश्विनी लांडगे  
साकोली अविनाश ब्राह्मणकर नाना पटोले    

नाना पटोले

तुमसर राजू कारेमोरे चरण वाघमारे    

भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती 

भंडारा

भंडारा मतदारसंघात महायुतीकडून नरेंद्र भोंडेकर हे रिंगणात होते त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून पूजा ठावकर मैदानात होते. अश्विनी लांडगे या अपक्ष उमेदवार होते. 

साकोली

साकोली मतदारसंघात अविनाश ब्राह्मणकर उमेदवार होते. त्यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आव्हान होतं.

तुमसर

महायुतीचे राजू कारेमोरे हे उमेदवार आहेत. तसेच महाविकास आघाडीकडून चरण वाघमारे रिंगणात आहेत.


2019 मध्ये अशी झाली होती लढत

 2019 मध्ये सर्वच पक्ष वेगवेगळे लढले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र लढलेत तर शिवसेना, भाजप ही वेगवेगळी लढली होती. काँग्रेसकडून भंडाऱ्याची उमेदवारी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जयदीप कवाडे यांना देण्यात आली होती. तर, भाजपकडून अरविंद भालाधरे आणि अपक्ष म्हणून नरेंद्र भोंडेकर यांनी निवडणूक लढवली. यात नरेंद्र भोंडेकर यांनी विजयी मिळविला. सध्या ते आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. 

ही बातमी वाचा : 

Sangli Assembly Election : सांगली जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोणाची बाजी? 8 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!