Election 2022: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणूकीची (Elections) रणधुमाळी सुरु आहे. पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणूक पार पडत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवीर विविध नेतेमंडळीसह काही कलाकारही पक्षप्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री रिमी सेनने (Rimi Sen) उत्तराखंड काँग्रेसमध्ये तर अभिनेत्री माही गिलने (mahie gill ) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 


रिमी सेनच्या काँग्रेस प्रवेशाची माहिती हरीश रावत यांनी ट्वीट करत दिली असून त्यांनी रिमीच्या प्रवेशाचा व्हिडीओही शेअर केला आहे. हरीश रावत यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे, “भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजपाची माजी स्टार प्रचारक आता काँग्रेसमध्ये सामिल होत आहे.'' गोलमाल, हंगामा, दीवाने हुए पागल, धूम 2, फिर हेरा-फेरी सारख्या हीट चित्रपटात काम करणारी रिमी बिग बॉस-9 मध्येही सहभागी झाली होती. सध्या ती चित्रपटसृष्टीपासून दूर असून 2017 मध्ये भाजप पक्षात सामिल होणारी रिमी आता काँग्रेसमध्ये पोहोचली आहे.



दुसरीकडे बॉलीवुडसह भोजपुरी सिनेमांमधील प्रसिद्ध चेहरा माही गिल हीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी माही गिलचं भाजपमध्ये स्वागत केलं.  2009 सालच्या ‘देव-डी’ सिनेमांतून प्रसिद्धीस आलेल्या माही गिलने अनेक सिनेमा तसंच वेब सिरीज आणि आयटम साँगमध्ये काम केलं आहे. तिने पंजाबी इंडस्ट्रीमध्येही काम केलं आहे.  शिवाय ‘साहेब बीवी और गैंगस्टर’,दबंग, पान सिंह तोमर, दबंग 2, साहेब बीवी और गँगस्टर्स रिटर्न्स, जंजीर, बुलेट राजा, साहेब बीवी और गँगस्टर 3, दुर्गामती आणि दूरदर्शन या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha