नवी दिल्ली: आमचा एखादा पराभव जरी झाला तर आम्ही अनेक महिने त्यावर चिंतन करतोय, पण काँग्रेसचा एवढ्या वेळा पराभव झाला तरी त्यांचा अहंकार जात नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. देशातल्या अनेक भागात काँग्रेसला गेल्या अनेक वर्षांमध्ये सत्ता मिळाली नाही असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते. त्यावेळी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या खासदारांवर त्यांनी चांगलीच टीका केली. 


दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये काही बदल झाला आणि एक नवीन वर्ल्ड ऑर्डर प्रस्थापित झाली. त्यानंतर जग बदललं. कोरोनानंतर आता पुन्हा एकदा जग नव्या वर्ल्ड ऑर्डरच्या दिशेने प्रवास करत असून जगामध्ये बदलाचं वारं वाहत आहे. ही संधी भारताने आपल्या हातून सोडू नये, भारताला एक महत्त्वाचा देश म्हणून उभारणं गरजेचं आहे. देशाच्या अमृत महोत्सवाच्या वर्षी आपण काही संकल्प केल्यास, पूर्ण शक्तीने काम केल्यास त्याचा परिणाम सकारात्मक होईल असं प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 


काय म्हणाले नरेंद्र मोदी?
कोरोना महामारीच्या सुरवातीच्या काही काळात मुंबईतील स्थलांतरित नागरिकांना मुंबईवरील ओझं असल्याचं सांगत त्यांना यूपी आणि बिहारमध्ये परत पाठवण्यात आलं. काँग्रेसने मुंबईतल्या परप्रांतीय मजुरांना रेल्वेची मोफत तिकीटे काढून दिली आणि महाराष्ट्रावरील बोजा कमी करण्याचं आवाहन केलं. राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते स्टेशन बाहेर उभे राहून स्थलांतरीत मजुरांना राज्याबाहेर पाठवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगून त्यांनी काँग्रेसनेच देशभरात कोरोना पसरवल्याचा आरोप केला. यूपी बिहारमध्ये जाऊन कोरोना पसरवा असं ते स्थलांतरीत मजुरांना सांगत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत होते.


संबंधित बातमी