मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024 Result) चांगलीच चुरशीची ठरली. महाराष्ट्रातील जनतेने यावेळी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पारड्यात मतं टाकली. येथे महाविकास आघाडीला एकूण 30 जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीडे महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत बीड या मतदारसंघात सर्वाधिक अटीतटीची लढत झाली. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांचा विजय झाला. दरम्यान, याच पराभवानंतर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्या 4 जून रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
माझ्या आयुष्यातील सर्वांत विचित्र, वेगळी अशी ही निवडणूक होती. मी जेव्हा मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले तेव्हा समोरील जमाव फारच आक्रमक होता. माझ्या आयु्ष्यात पहिल्यांदा माझ्या जमावाने कारच्या काचांना बुक्क्या मारल्या. मी विजय, पराभव सगळं पाहिलेलं आहे. पण बीड जिल्ह्यात मी असं कधी पाहिलं नाही. हेच थोडं अस्वस्थ करणारं आहे, अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.
बघू आमच्या वाट्याला काय येतं?
त्यांना विजय पचवता आला पाहिजे. त्यांच्या विजयामध्ये कोणाचं योगदान आहे, कोणत्या विषयांचं योगदान आहे हा वेगळा विषय आहे. मला या जिल्ह्याची काळजी वाटत होती. आता बघू आमच्या आयुष्याच्या वाट्याला, अनुभवाला काय काय येतं, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
बीडमध्ये कोणाला किती मतं मिळाली?
बजरंग सोनवणे (शरद पवार गट)- 6 लाख 83 हजार 950 मते
पंकजा मुंडे (भाजप)- 6 लाख 77 हजार 397 मते
अशोक हिंगे (वंचित)- 50 हजार 867 मते
--------------------
पंकजा मुंडे यांचा 6553 मतांनी पराभव
हेही वाचा :
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 30
महायुती- 17
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
---------------------
एकूण- 17
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8
-----------------
एकूण- 30
हेही वाचा :
तुतारी, पिपाणीचा घोळ! साताऱ्यात संजय गाडेंच्या चिन्हामुळे शिंदेंचा पराभव? वाचा नेमकं काय घडलं?
पंकजा मुंडेंचा पराभव का झाला, नेमकी कारणे काय? जाणून घ्या बजरंग सोनवणे यांच्या विजयाची वैशिष्ट्ये