Beed, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : श्वास रोखायला लावणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. अटीतटीच्या लढतीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना का करावा लागला ? मराठा आरक्षण हा बीडमध्ये कळीचा मुद्दा ठरल्याची चर्चा राजकीय जाणकरांमध्ये होत आहे. पाहूयात पंकजा मुंडेंच्या पराभवाची कारणं काय आहेत, बजरंग सोनवणे यांच्या विजयाची वैशिष्ट्ये ...
पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारणे काय ?
अवघ्या 6000 मतांनी पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात भाजपने म्हणजे सत्ताधारी पक्षांनी घेतली भूमिका लोकापर्यंत सकारात्मक गेली नाही, आणि त्याचा मोठा परिणाम पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या बाबतीत लोकांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळत होतं. काही अंशी राज्यामध्ये पक्षाच्या फोडाफोडीनंतर भाजपाविषयी लोकांच्या मनात असलेल्या भावना लोकांनी या निवडणुकीमध्ये स्पष्ट मांडल्या, याचा फटका पंकजा मुंडे यांना बसला.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या आरक्षणाच्या प्रश्नाचा सर्वाधिक परिणाम हा बीड आणि परिसरात होत होता, मात्र मनोज जरांगे यांनी उभा केलेल्या या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्मिती झाली. यात ओबीसी पंकजा मुंडे यांच्या बाजूने झाले तर मराठा स्पष्टपणे पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभा राहिला. बीड जिल्हा हा बहुतांश मराठा मतांचा टक्का असलेला जिल्हा आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये मराठा मतदान विरोधात गेल्यामुळे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.
बजरंग सोनवणे यांच्या विजयाची वैशिष्ट्ये
अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले. यामुळे बीड जिल्ह्यामध्ये शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे तो आपल्या बाजूने करण्यात बजरंग सोनवणे यांनी यश मिळवलं. त्याचाच परिणाम आपण बघतोय की बजरंग सोनवणे हे खासदार झाले.
सर्वात महत्त्वाचा ठरला जरांगे फॅक्टर.
तब्बल साडेसहा लाखापेक्षा जास्त मते घेऊन बजरंग सोनवणे हे खासदार झाले, मात्र बजरंग सोनवणे यांच्या या खासदारकीच्या प्रवासामध्ये सर्वाधिक मोठा वाटा राहिला तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा.
मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरचा लढा उभा राहिला तो बीड परिसरामध्ये मात्र या लढ्याचा सर्वाधिक परिणाम हा बीड जिल्ह्यामध्ये जाणवत होता. या परिस्थितीमध्ये बजरंग सोनवणे यांनी लोकसभेवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि आधीच सरकार विरोधी मराठा समाजामध्ये जो आक्रोश होता तो इन कॅश करण्याचा प्रयत्न केला त्यात बजरंग सोनवणे हे यशस्वी ठरले.
जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत बीड विधानसभे मतदारसंघातील आमदार संदीप क्षीरसागर हे सोबत राहिले, या व्यतिरिक्त कोणही बडा नेता नसताना बजरंग सोनवणे यांनी पूर्ण जिल्हा पालथा घातला आणि यापूर्वीच्या राजकीय अनुभवाचा फायदा घेत तीन ते चार आठवड्याच्या मेहनतीवर सोनवणे यांनी मोठी ताकद निर्माण केली..
कोणत्या विधानसभा मतदारसंघातील स्थिती काय ?
परळी विधानसभा मतदारसंघ...
बजरंग सोनवणे - 66940
पंकजा मुंडे - 141774
गेवराई विधानसभा मतदारसंघ..
बजरंग सोनवणे - 134505
पंकजा मुंडे - 95409
माजलगाव विधानसभा मतदारसंघ..
बजरंग सोनवणे - 104713
पंकजा मुंडे - 105648
बीड विधानसभा मतदारसंघ..
बजरंग सोनवणे - 139264
पंकजा मुंडे - 77583
आष्टी विधानसभा मतदारसंघ...
बजरंग सोनवणे - 139264
पंकजा मुंडे - 77583
केज विधानसभा मतदारसंघ..
बजरंग सोनवणे - 123158
पंकजा मुंडे - 109360