Baramati Lok Sabha Election Result 2024 :  महाराष्ट्रातील सर्वात  प्रतिष्ठेची लढाई  ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली आहे. कारण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेल्या  पवार कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरल्या आहेत.  शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad pawar, NCP)पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार (Ajit PAwar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)मैदानात उतरल्या आहेत. नणंद-भावजयच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेय. बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार साहेबांसोबत इमोशनली कनेक्टेड आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे . प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता.   सुप्रिया सुळेंनी  16 व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारली आहे. सुप्रिया सुळेंना 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाला आहे.  

उमेदवाराचे नाव पक्ष         विजयी उमेदवार
सुप्रिया सुळे    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र  पवार  विजयी
सुनेत्रा पवार  राष्ट्रवादी काँग्रेस  

बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) एकूण 59.50 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानात काहीशी घट झाली आहे. 2019 मध्ये बारामतीत 61.70 टक्के मतदान झाले होते. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत ही अटीतटीची आहे. त्यामुळे मतदानातील ही साधारण 2 टक्क्यांची घटही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.  बारामती लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघामधील मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास खडकवासला आणि पुरंदरमध्ये मतदानाची सर्वाधिक कमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असल्याने या भागातून सुनेत्रा पवार यांना मोठी लीड मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, खडकवासला मतदारसंघात अवघे 51.55 टक्के मतदान झाले आहे. ही महायुतीच्यादृष्टीने चिंताजनक बाब मानली जात आहे. याशिवाय, सुरुवातीच्या काळात अजित पवार यांना कडवा प्रतिकार करणाऱ्या विजय शिवतारे यांच्या पुरंदरमध्ये अवघे 53.96 टक्के मतदान झाले आहे.

कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान? (Baramati Lok Sabha Voting Percentage 2024)

  • एकूण झालेले मतदान - 14 लाख 12 हजार 875
  • एकूण मतदान - 59.50 टक्के
  • सुप्रिया सुळे एकूण मतदान - 7 लाख 32 हजार 312
  • सुनेत्रा पवार एकूण मतदान - 5 लाख 73 हजार 979

दौंडमध्ये किती मतं मिळाली?

  • दौंड - 60.29 टक्के
  • सुप्रिया सुळे -92 हजार 64 
  • सुनेत्रा पवार - 65 हजार 727 (लीड सुप्रिया सुळे 26 हजार 337

इंदापूरमध्ये किती मतं मिळाली?

  • इंदापूर - 67.12 टक्के
  • सुप्रिया सुळे - 1 लाख 14 हजार 20
  • सुनेत्रा पवार - 88 हजार 69 (लीड सुप्रिया सुळे 25 हजार 951)

बारामतीमध्ये किती मतं मिळाली?

  • बारामती - 69.48 टक्के
  • सुप्रिया सुळे -1लाख 43 हजार 941
  • सुनेत्रा पवार - 96 हजार 560 (लीड सुप्रिया सुळे 47 हजार 381)

पुरंदरमध्ये किती मतं मिळाली?

  • पुरंदर- 53.96 टक्के
  • सुप्रिया सुळे -1लाख 25 हजार 948
  • सुनेत्रा पवार - 90 हजार 667 (लीड सुप्रिया सुळे 35 हजार 281)

भोरमध्ये किती मतं मिळाली?

  • भोर - 60.11 टक्के
  • सुप्रिया सुळे -1लाख 34 हजार 245
  • सुनेत्रा पवार - 90 हजार 440 (लीड सुप्रिया सुळे 43 हजार 805)

 खडकवासलामध्ये किती मतं मिळाली?

  •  खडकवासला - 51.55 टक्के
  • सुप्रिया सुळे - 1लाख 21हजार 182
  • सुनेत्रा पवार - 1लाख 41हजार 928 (लीड सुनेत्रा पवार 20 हजार 746)

बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये  सुप्रिया सुळे यांनी एकूण मिळवलेले मताधिक्य - 1लाख 58 हजार 333

कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण आमदार?

  • दौंड - राहुल कुल
  • इंदापूर - दत्तात्रय भरणे
  • बारामती - अजित पवार
  • पुरंदर-   संजय जगताप
  • भोर - संग्राम थोपटे
  • खडकवासला -  भिमराव तापकीर

2019 सालचा निवडणूक निकाल - (Baramati Lok Sabha Constituency 2019 Result)

  • सुप्रिया सुळे- 4,87,827 मते (विजयी)
  • कांता नलावडे- 1,50,996 मते (पराभूत)
  • मताधिक्य - 2 लाख 46 हजार

2014 साली महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यामध्ये जानकर यांचा 69 हजार 666 मताने पराभव झाला होता. 2019 मध्ये भाजपच्या राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी कांचन कुल यांचा 1 लाख 30 हजार मतांनी पराभव झाला होता.

प्रचारात कोणाची बाजी?

2009 पासून सुप्रिया सुळेंना, शरद पवारांना इथे फार लक्ष द्यायची वेळ कधीच आली नाही . फक्त लीड मोजायची आणि जिंकल्याचं प्रमाणपत्र घेऊन जायचं एवढंच काम सुप्रिया सुळेंसाठी शिल्लक असायचं.  आता मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे हे चित्र बदललं आहे. पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार समोरासमोर आहेत. एकीकडे अजित पवारांची कुटुंबाने साथ सोडली तरी हर्षवर्धन पाटील, विजय बापू शिवतारे, राहुल कुल जोमाने कामाला लागले आहेत. एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस- अजित पवार यांनी ग्राऊंड लेव्हलवरील सर्व नियोजन व्यवस्थित केलं आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंसोबत अख्ख पवार कुटुंब दिसले. सर्वात म्हणजे शरद पवार गटाकडून ही निवडणूक भावनिक करण्यात आली आहे.

2019 चे विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

2019 ला सुप्रिया सुळे 1 लाख 55 हजार मतांनी विजयी  झाल्या होत्या, त्यातील 1 लाख 27 हजार 918 मतांचा लीड एकट्या बारामती ने दिला होता. तर इंदापुरने 70  हजार 938 मतांचा लीड दिला होता. या दोन्ही मतदारसंघातून लीड मिळणे तोही एवढा मोठा हे सध्याची परिस्थिती पाहता तरी दुरापास्तच वाटते आहे. गेल्या वेळी सुप्रिया सुळेंना सहापैकी बारामती, इंदापूर, भोर, पुरंदर या 4 मतदारसंघात मताधिक्य मिळाले होते. तर भाजपच्या कांचन कुल यांना दौंड मधून 7 हजाराची तर खडकवासल्यातून तब्बल 65 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे बारामतीत मतदान कट टू कट झाले तरी दौंड आणि खडकवासल्यातलं मताधिक्य टिकवले किंवा वाढवले तरी सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर बनेल असे गणित असू शकते. दौंडमध्ये महेश भागवत कुणाचं गणित बिघडतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. पुरंदरमधून गेल्यावेळी सुप्रिया सुळेंना 9 हजाराची आणि थोपटेंच्या भोर मधून 19 हजाराची लीड मिळाली होती. 

हे ही वाचा :

Baramati Exit Poll Result 2024 Lok Sabha Election : ताई की वहिनी? बारामतीच्या सर्वाधिक हाय व्होल्टेज लढतीत बारामतीकरांचा कौल कोणाला?