Baglan Vidhan Sabha Constituency : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात एकाचा टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. नाशिकच्या बागलाण विधानसभा मतदारसंघात (Baglan Assembly Constituency) महायुतीत (Mahayuti) भाजपने (BJP) पुन्हा एकदा विद्यमान आमदार दिलीप बोरसे (Dilip Borse) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar Group) दीपिका चव्हाण (Dipika Chavan) यांना उमेदवारी दिली आहे. बागलाणमध्ये दिलीप बोरसे विरुद्ध दीपिका चव्हाण यांच्यात थेट लढत होणार असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


बागलाण मतदार संघ हा चाळीस वर्षापूर्वी अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आणि त्यानंतर या मतदार संघात बोरसे आणि चव्हाण या दोन कुटुंबातील सदस्यांमधील उमेदवार निवडणुकीत विजयी होत आले. बागलाण विधानसभा मतदारसंघात सुमारे 40 टक्के आदिवासी जनता आहे. दलित समाजाचा व्होटर शेअर सुमारे पाच टक्के आहे. मुस्लिम समुदायाचा सुमारे 2.5 टक्के आहे. शहरी आणि ग्रामीण मतदारांची स्थिती पाहिल्यास, 90 टक्के ग्रामीण आणि 10 टक्के शहरी मतदार आहेत. 


दिलीप बोरसे विरुद्ध दीपिका चव्हाण थेट लढत 


सध्या बागलाण विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांच्या ताब्यात आहे. यापूर्वी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका चव्हाण यांचा कब्जा होता. 2009 मध्ये उमाजी मंगळू बोरसे यांनी या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. या मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून 1962 ते 1990 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा गड मानला जात होता. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या दिलीप बोरसे यांनी दीपिका चव्हाण यांचा पराभव केला होता. दिलीप बोरसे यांना 94,683 मतं मिळाली होती, तर दीपिका चव्हाण यांना 60,989 मतं मिळाली. भाजपच्या दिलीप बोरसे यांनी मोठ्या मतांच्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपिका यांना पराभूत केले होते. यंदा पुन्हा एकदा दिलीप बोरसे आणि दीपिका चव्हाण यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. या मतदारसंघातून मतदार यांचा कुणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


आणखी वाचा 


Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार?