Aurangabad Gram Panchayat Election: राज्यातील सात हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी काल (रविवारी) निवडणुका पार पडल्या. दरम्यान औरंगाबाद (Aurangabad News) जिल्ह्यातील (Gram Panchayat Election) 208 ग्रामपंचायतीसाठी काल (रविवारी) मतदान झाले. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यासाठी एकूण 86.55 टक्के मतदान झाले आहे. ज्यात जिल्ह्यातील एकूण 304361 स्त्री-पुरुष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 208 ग्रामपंचायतीसाठी 711 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 144015 स्त्री आणि 160346 पुरुष असे एकूण 304361 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 86.55 टक्के मतदान झाले आहे. तर मंगळवारी म्हणजेच 20 डिसेंबरला ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात येत असून, मतमोजणीच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त असणार आहे.
पाहा कोणत्या तालुक्यात किती मतदान...
औरंगाबाद तालुका: औरंगाबाद तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीसाठी 129 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 24246 स्त्री आणि 27953 पुरुष असे एकूण 52199 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे औरंगाबाद तालुक्यात एकूण 87.22 टक्के मतदान झाले आहे.
पैठण तालुका: पैठण तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीसाठी 94 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 20519 स्त्री आणि 23589 पुरुष असे एकूण 44108 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे पैठण तालुक्यात एकूण 86.64 टक्के मतदान झाले आहे.
फुलंब्री तालुका: फुलंब्री तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी 59 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 12199 स्त्री आणि 13684 पुरुष असे एकूण 25883 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे फुलंब्री तालुक्यात एकूण 87.00 टक्के मतदान झाले आहे.
सिल्लोड तालुका: सिल्लोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीसाठी 65 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 15260 स्त्री आणि 17913 पुरुष असे एकूण 33173 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सिल्लोड तालुक्यात एकूण 85.57 टक्के मतदान झाले आहे.
सोयगाव तालुका: सोयगाव तालुक्यातील 04 ग्रामपंचायतीसाठी 12 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 2534 स्त्री आणि 2077 पुरुष असे एकूण 4611 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सोयगाव तालुक्यात एकूण 86.11 टक्के मतदान झाले आहे.
कन्नड तालुका: कन्नड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीसाठी 153 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 29443 स्त्री आणि 33977 पुरुष असे एकूण 63420 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे कन्नड तालुक्यात एकूण 87.70 टक्के मतदान झाले आहे.
खुलताबाद तालुका: खुलताबाद तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीसाठी 31 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 6952 स्त्री आणि 8142 पुरुष असे एकूण 15094 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे खुलताबाद तालुक्यात एकूण 88.82 टक्के मतदान झाले आहे.
वैजापूर तालुका: वैजापूर तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीसाठी 74 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 15760 स्त्री आणि 13460 पुरुष असे एकूण 29220 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे वैजापूर तालुक्यात एकूण 85.59 टक्के मतदान झाले आहे.
गंगापूर तालुका: गंगापूर तालुक्यातील 31 ग्रामपंचायतीसाठी 94 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 17102 स्त्री आणि 19551 पुरुष असे एकूण 36653 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे गंगापूर तालुक्यात एकूण 84.12 टक्के मतदान झाले आहे.