Ashok Chavan, Nanded : माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातून (Bhokar Vidhansabha Election) निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत श्रीजया चव्हाण यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान, कन्येने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भोकरमध्ये श्रीजया चव्हाण यांचा पन्नास हजारांनी विजयी झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघात मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी सभा घेतली. मुखेड इथल्या सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर सडकून टीका केली. ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाल्याचा अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केले. हे महाराष्ट्राचा निर्णय घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर बोलताना चव्हाण म्हणाले, नांदेडला येऊन भोकर भोकर करत होते पण ते फक्त दीडशे मतांनी आले. हे काय महाराष्ट्राचे नेतृत्व करणार? असा सवालच अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.
पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय. ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध भाजपचे अतुल भोसले असा सामना रंगला होता. या लढतीत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला आहे.
यशोमती ठाकूर यांचाही पराभव
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्याविरोधात राजेश वानखेडे (Rajesh Wankhede) यांना उमेदवारी दिली होती. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचा पराभव झाल्याचे निश्चित मानले जात आहे.
बाळासाहेब थोरात यांचा देखील पराभव
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. बाळासाहेब थोरात सातत्याने या मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, यावेळी मतदारांनी त्यांचा आमदार बदलला आहे. बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून अमोल खटाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. अमोल खटाळ यांनी थोरातांचा 10 हजार 560 मतांनी पराभव केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या