MNS, Mumbai : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आलं. मनसेची निवडणुकीत अतिशय सुमार कामगिरी पाहायला मिळाली. पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. शिवाय पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असणारी पक्षाची मतांची टक्केवारी देखील मिळवता आली नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते. याबाबतची माहिती विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी दिली आहे. 


अनंत कळसे काय म्हणाले?


एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असेल तर एकूण आठ टक्के मतदान पाहिजे किंवा एक जागा निवडून यायला पाहिजे. दोन जागा आणि सहा टक्के मतदान किंवा तीन जागा आणि तीन मतदान मिळायला हवं, असा निवडणूक आयोगाचा निकष आहे, असं अनंत कळसे म्हणाले. 


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवली होती. मनसेने विधानसभेच्या 125 जागांवर उमेदवार जाहीर केले होते. मात्र, एकाही जागावर त्यांना विजय मिळवता आलेला नाही. पन्नास हजारांपेक्षा जास्त मतं मिळवलेला मनसेचा केवळ एक उमेदवार आहे. 20 हजार ते 50 हजार दरम्यान मत मिळवणारे 13 उमेदवार होते.  


महाराष्ट्र विधासभा निवडणुकीत मनसेला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मागील विधानसभेचं चित्र पाहिलं तर त्यांचा एक आमदार निवडून आला होता. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 


निवडणूक आयोगाचे मान्यतेबाबतचे निकष काय? 


निवडणुकीत आठ, सहा किंवा तीन टक्के मतं एखाद्या राजकीय पक्षाने मिळवायला हवी असतात. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही टक्केवारी गाठू शकलेली नाही. त्यामुळे त्यांची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे. याशिवाय संबंधित पक्षाचे एक किंवा दोन आमदार निवडून येणे देखील महत्त्वाचे आहे. या निकषामध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना बसत नाही. या संदर्भातील निर्णय लवकरच निवडणूक आयोग घेईल. 


निवडणुकीत ज्या गोष्टी पूर्ण करायला हव्या होत्या, त्या मनसेला पूर्ण करायला हव्यात. मात्र, आत्तापर्यंत मनसेकडून याची पूर्तता करण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसेला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Katol Vidhan Sabha Election 2024 : वडिलांचा गड राखण्यात सलील देशमुख अपयशी, काटोलमध्ये भाजपचे चरणसिंग ठाकूर ठरले 'किंग' 


Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत