Shukra Gochar 2024 : वर्ष 2024 च्या शेवटी अनेक ग्रह राशी बदलतील. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना याचा बहुतांश फायदा होईल, तर अनेक राशीच्या लोकांना नवीन वर्षात सावध राहण्याची गरज आहे. शुक्र सुमारे 26 दिवसांनी आपली राशी बदलतो. राक्षसांचा स्वामी शुक्र डिसेंबर महिन्यात एकदा नाही, तर दोनदा राशी बदलेल. शुक्राच्या (Venus) राशी बदलाचा परिणाम प्रेम जीवन, करिअर, व्यवसाय, उत्पन्न आणि आरोग्यावर दिसून येतो.

Continues below advertisement

वैदिक पंचांगनुसार, शुक्र 2 डिसेंबर रोजी दुपारी 12:05 वाजता मकर राशीत प्रवेश करेल आणि 28 डिसेंबर 2024 रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल. शुक्राने शनीचा राशीत प्रवेश केल्याने याचा चांगलाच फायदा 3 राशींना होणार आहे, या 3 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

कुंभ रास (Aquarius)

डिसेंबर महिन्यात शुक्र या राशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या घरात असेल. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना बंपर लाभ मिळू शकतो. अपार संपत्ती मिळू शकते, नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. यासोबतच तुमच्या कामाचं कौतुक होईल. सहकाऱ्यांमध्ये तुमचा आदर वाढेल. व्यवसायाच्या क्षेत्रातही भरपूर फायदा होणार आहे. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. यासोबतच प्रेमविवाहाच्या अनेक शक्यता आहेत.

Continues below advertisement

सिंह रास (Leo)

शुक्र या राशीच्या सहाव्या आणि सातव्या घरात असणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकतो. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेला वाद संपुष्टात येईल. यासोबतच अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुमचं आरोग्यही या काळात चांगलं राहील.

वृषभ रास (Taurus)

डिसेंबर महिन्यात शुक्र या राशीच्या नवव्या आणि दहाव्या घरात उपस्थित असेल. अशा स्थितीत वृषभ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. कुटुंबासोबत सुरू असलेले मतभेद संपुष्टात येऊ शकतात. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. यातून तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतात. व्यवसायासंदर्भात तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. पण यातून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुमचं लव्ह लाईफ या काळात चांगलं राहील. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Astrology : नवीन वर्ष 2025 मध्ये बनतोय दुर्मिळ योग; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह होणार अपार धनलाभ