Ajit Pawar Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आगामी विधानसभेच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीला 175 पेक्षा जास्त जागा मिळणार, याबद्दल काहीच शंका नाही. राज्यात पुन्हा महायुतीचेचं सरकार येणार असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. 


बारामतीमध्ये लोकसभत जी परिस्थीती होती, त्यापेक्षा आता वेगळी परिस्थिती आहे. लोकसभेच्या वेळी लोकांनी ठरवलं असावं की अजित पवार कामाचा माणूस असला तरी आपण शरद पवारांसोबत जायचं आणि सुप्रिया सुळेंना मतदान केलं. लोक बोलत होते लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा...असं अजित पवारांनी सांगितले.  तसेच बारामतीतील ग्रीनरी, सुविधा, शिक्षण सोयी, कायदा सुव्यवस्था सगळं आलबेल आहे, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. 


शरद पवारांसोबत एकत्र येणार?, अजितदादा काय म्हणाले?


माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी ज्यावेळेस सगळ्या नेत्यांनी दिली तेव्हा मी ठरवलं की प्रत्येक शब्द तोलून मापून बोलायचा. उद्या जर माझ्याकडून एखादा वेगळा शब्द बाहेर पडला, तर कार्यकर्ते माझ्यावर संशय घेतील. जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून आजपर्यंत मी एकही असा शब्द काढला नाही, ज्याचा फटका महायुतीला आणि उमेदवाराला बसेल. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, आम्ही दोघं उपमुख्यमंत्री आहोत तोवर या गोष्टीवर मी अजिबात चर्चा करणार नाही, हे मी ठरवलं असल्याचं अजित पवारांनी सांगितले. तसेच पवार कुटुंब एकत्र येणार का?, असा सवाल विचारताच नातंच घट्ट आहे असं तुम्ही म्हणता, मग पुन्हा एकत्र येणार असं का म्हणता?, असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी विचारला. 


लोकसभेत पराभव का झाला?


लोकसभेत पराभव का झाला, असा प्रश्व विचारल्यानंतर लोकांनी शरद पवारांच्या वयाचा आदर केला. शरद पवारांची मुलगी उभी आहे म्हणून मतदान केलं. संविधान, घटना बदलणार, आरक्षण जाणार, म्हणून अबकी बार 400 पार या फेक नरेटिव्हमुळे मराठाड्यात मोठा फटका बसला. सीएए आणून तुम्हाला गोळा करून परदेशात पाठवणार अशा खोट्या बातम्या सांगितल्या. कांदा निर्यातबंदीचा फटका सहा-सात तालुक्यात बसला. लोक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. आम्ही संविधान भवन बांधतोय, न्यायदेवतेची प्रतिमा बदलली. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक बैठकीत संविधानाला नमस्कार करतात. हे सगळं असतानाही विरोधक फेकनरेटिव्ह सेट करतात. आम्ही काय केलं ते सांगत नाही, अशी टीका अजित पवारांनी केली.




संबंधित बातमी:


Ajit Pawar in Baramati: बाकीच्यांचं वय बघता बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची: अजित पवार