मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता आठवडा पुर्ण झाला. मात्र, अद्याप मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ यांच्या चर्चा आणि पेच सुटत नसल्याचं चित्र आहे. राज्यातील आमदार मंत्रापदी वर्णी लागण्यासाठी गाठीभेटी घेत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली असल्याने त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीत असल्याने अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. ते शिवसेनेच्या इतक्या जागांची मागणी करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे, यासाठी ते भाजप श्रेष्ठींची भेट घेणार असल्याच्या चर्चा होत्या. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या (NCP Ajit Pawar) पक्षाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी माध्यामांशी सविस्तर भाष्य केलं आहे. (Sunil Tatkare made detailed comments on Ajit Pawars visit to Delhi)
अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेटीसाठी वेळ मागितलेली नव्हती. भेट देखील झाली नव्हती. त्यामुळे वेळ घेण्याचा किंवा वेटिंगवर राहण्याचा काहीच प्रश्न नाही किंवा आमच्यामध्ये कोणत्याही मिस कम्युनिकेशन असण्याचं काहीच कारण नाही, अजित पवार (Ajit Pawar), अमित शाह (Amit Shah) यांच्या भेटीसाठी पूर्वनियोजित ठरवून आलेले नाहीत, कोणाच्या सुपीक डोक्यातून हे वृत्त निघालेलं आहे हे माहिती नाही, हे वृत्त खोटं आहे, दादा वेटिंग वर आहेत हे चुकीचं वृत्त आहे असेही तटकरेंनी पुढे म्हटले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) हे चंदिगड दौऱ्यावर आहेत हे माहिती आहे त्यामुळे अजित पवार वेटिंग वर असण्याचा काहीच प्रश्न नाही असे सुनील तटकरे पुढे म्हणाले आहेत.
किती मंत्री पद मिळावीत अशी पक्षाची भूमिका आहे. या प्रश्नावर उत्तर देताना सुनील तटकरे म्हणाले, ज्यावेळी आम्ही या प्रश्नावरील चर्चेसाठी बसू अमित शाह (Amit Shah) , देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार (Ajit Pawar) हे सर्वजण जेव्हा चर्चेसाठी बसू त्यावेळी या संदर्भात चर्चा करू, असं ते म्हणालेत. त्याचबरोबर अमित शाह यांच्यासोबत अजित पवारांची बैठक होऊ शकते, असे संकेतही तटकरेंनी यावेळी बोलताना दिले आहेत. अमित शाह चंदिगडमध्ये आहेत. आम्ही रात्री सगळे राजकीय चर्चा करू शकतो. ते काय होतंय ते आम्ही बोलू. संघटनाबाबत आमची रात्री सविस्तर चर्चा झाली. अमित शाह यांच्यासोबत काही चर्चा करू. येत्या 5 तारखेला शपथविधी आहे, असंही सुनिल तटकरे म्हणालेत.
केसरकरांच्या नाराजीवर तटकरेंचं भाष्य
महायुती सरकारच्या मुख्यमंत्र्याच आणि मंत्रीपदांचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती आहे. या शपथविधीची पाहणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली. त्यावर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त करत महायुतीत तिन्ही पक्ष एकत्र आहेत. जर आम्हाला सांगितलं असतं पाहणी करायला चला तर आम्ही गेलो असतो, असं म्हणत नाराजी व्यक्त केली यावर तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'केसरकर यांनी व्यक्त केलेली गोष्ट रास्त असू शकते. आज सगळे नेते एकत्र पाहणी करतील. आज आमच्याही पक्षाचे नेते धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील पाहणीसाठी जातील. हसन मुश्रीफ मुंबईत असतील तर तेही जातील,' असं तटकरे म्हणाले आहेत.