अहमदनगर : अहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 23 जागा, शिवसेना 24, भाजप 14 आणि इतरांना 7 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.


सत्तास्थापनेसाठी अहमदनगरमध्ये शिवसेना आणि भाजपला आघाडी करावी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर निवडणुकीतला सर्वात धक्कादायक निकाल म्हणजे शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम दोन हजार मतांनी विजयी झाला आहे. दरम्यान महापालिका त्रिशंकू झाल्यास महापौरपदासाठी घोडेबाजाराची परंपरा कायम राहणार असल्याचं चित्र दिसत आहे

30 जून 2003 रोजी अहमदनगर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्याचवर्षी डिसेंबरला पहिली निवडणूक झाली. या निवडणकीमध्ये सर्वाधिक जागा शिवसेना-भाजप युतीने जिंकल्या होत्या. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी शिवसेनेचे भगवान फुलसौंदर यांना पहिला महापौर होण्याचा मान मिळाला. त्यानंतर सत्ताधारी गटात फाटाफूट झाल्याने या पंचवार्षिकमधील दुसरे महापौरपद काँग्रेसने मिळवले. यावेळी संदीप कोतकर महापौर बनले.

2008 मध्ये झालेल्या दुसऱ्या निवडणुकीतही शिवसेना-भाजप युती बहुमताच्या जवळ पोहोचली होती. या निवडणुकीमध्ये शिवसेनेला 18, भाजपला 12, काँग्रेसला 9, राष्ट्रवादी 14, मनसे 2 तर अपक्ष 2 आणि इतरांना 2 जागा मिळाल्या. पण पुन्हा फोडाफोडी होऊन राष्ट्रवादीचे संग्राम जगताप महापौर झाले. मात्र, झालेली फोडाफोडी जुळवून या पंचवार्षिकचे दुसरे महापौरपद शिवसेनेने पुन्हा मिळवले. शिला शिंदे या महापौर झाल्या.

2013 मध्ये झालेल्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत युती आणि काँग्रेस आघाडीला संमिश्र यश मिळाल्याने घोडेबाजार रंगला. शिवसेनेला 17, भाजपा 9, काँग्रेस 11 तर राष्ट्रवादीने 18 जागा मिळविल्या. मनसे 4, अपक्ष 9 अशा जागा मिळाल्या. यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारुन पुन्हा एकदा संग्राम जगताप महापौर झाले. त्यानंतर काही काळातच विधानसभा निवडणुकीत जगताप यांनी विजय मिळवला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर महापौर झाले. पण दुसऱ्या टप्प्यात असाच घोडेबाजार युतीनेही रंगवून पुन्हा शिवसेनेने महापौरपद मिळवले. आणि सुरेखा कदम महापौर बनल्या.

मागील 15 वर्षांत 7 महापौर झाले असून, त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन तर काँग्रेसचा एक महापौर झाला आहे. भाजपला अजून एकदाही हे पद भूषवता आलेले नाही. आता पार पडलेल्या निवडणुकीतही कोणत्यात पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. शिवसेना आणि भाजप यांनी ही निवडणुक स्वतंत्र लढविली होती. शहरातील अंतर्गत चौथ्या निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपाचा महापौर होण्याचे स्वप्न जवळपास मावळले आहे. त्यामुळे आता महापौरपदासाठी पुन्हा एकदा घोडेबाजार रंगण्याची चिन्हे आहेत.

अहमदनगर महानगरपालिका निकालाची वैशिष्ट्ये 

- राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केडगाव येथे आघाडीला धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 4 उमेदवारांचा विजय झाला आहे तर 8 जागांपैकी 4 जागा शिवसेनेकडे तर 4 जागा भाजपकडे आल्या आहेत.

- भाजपचे खासदार दिलीप गांधी यांना मोठा धक्का. गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी आणि सून दिप्ती गांधी हे दोघेही पराभवाच्या वाटेवर

- भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेल्या शिवाजी कर्डीले यांच्या दोन्ही कन्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी लढवत होत्या दोघींही विजयाच्या उंबरठ्यावर. मुलगी शीतल जगताप राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांची पत्नी

- कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी प्रचारात लक्ष न देऊनही निवडणूकीत मात्र आघाडी केली.

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या समारोपात सभा घेऊनही खासदार दिलीप गांधी यांना धक्का बसलाय.

- अहमदनगर निवडणूकीत भाजपने प्रचारात आघाडी घेतली. एकहाती सत्ता देण्याचे आवाहन केले. मात्र पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला सोबत घेण्याचा पर्याय भाजपला स्विकारावा लागेल असे चित्र.

- शिवसेनेचा एकही बडा नेता निवडणुकीत न उतरता शिवसेनेने आपला तंबू राखला.

- केडगाव पोटनिवडणुकीत 2 शिवसैनिकांची हत्या झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी अटक केली होती. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला.

- अहमदनगर जिल्हा हा कॉंग्रेसचा गड असला तरी कॉंग्रेस हा फक्त नावालाच उरला असल्याच या महानगरपालिका निवडणुकीतून समोर आलय.

 शिवरायांचा अवमान करणारा छिंदम विजयी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेल्या श्रीपाद छिंदमला राज्यभरातून रोषाचा सामना करावा लागला असला तरी नगरच्या जनतेने मात्र त्याला स्वीकारले आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम वॉर्ड क्रमांक 9 मधून 2000 पेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाला आहे.

ज्या भाजप पक्षाने छिंदमला निलंबित केलं, त्याच भाजपच्या उमेदवाराला छिंदमने पराभूत केले आहे. प्रदीप परदेशी हा भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे.

माजी उपमहापौर असलेल्या छिंदमने  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. त्याला भाजपमधून बाहेर काढल्यानंतर त्याने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली. विशेष म्हणजे गुन्हा दाखल असल्याने तो तडीपार असतानाही या निवडणुकीत विजयी झाला आहे.

छिंदम हा वॉर्ड क्रमांक 9 मध्ये अपक्ष उमेदवार आहे. याच वॉर्ड क्रमांक 9 मध्ये असलेल्या मतदान केंद्रात श्रीपादचा भाऊ श्रीकांतने पूजा केल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. या वादग्रस्त छिंदमच्या निकालाकडेही राज्याचं लक्ष लागले होते.

Ahmednagar Municipal Elections Live Result Updates

श्रीपाद छिंदम विजयाच्या दिशेने.  15 फेऱ्याअखेर 1000 मतांची आघाडी

13 व्या फेरी अखेर खासदार पुत्र आणि सून पिछाडीवर
दीप्ती गांधी 1739 तर सुवेंद्र गांधी 759 मतांनी पिछाडीवर

अहमदनगरमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज

अहमदनगरचा निकाल - प्रभाग 14
1) शीतल जगताप - राष्ट्रवादी
2) प्रकाश भागानगरे - राष्ट्रवादी
3) मीना चोपडा - राष्ट्रवादी
4) गणेश भोसले - राष्ट्रवादी

शीतल जगताप या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पत्नी तर भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांची मुलगी आहे.


शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम 400 मतांनी आघाडीवर



केडगावमधील 8 जागांपैकी 6 जागांवर शिवसेना आघाडीवर

शिवसेना शहराध्यक्ष दिलीप सातपुते 250 मतांनी पिछाडीवर, भाजपचे मनोज कोतकर आघाडीवर

शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत

अहमदनगर महानगरपालिका | त्रिशंकू स्थिती, भाजप-सेना सत्तेत येण्याची शक्यता

दीप्ती गांधी 449 मतांनी पिछाडीवर,सुवेंद्र गांधी 142 मतांनी आघाडीवर

भाजप खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुवेंद्र गांधी आघाडीवर



शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदमच्या विरोधात मनसेचे पोपट पाखरे आघाडीवर


भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांची मुलगी राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती गाडे आघाडीवर



शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम 160 मतांनी आघाडीवर, तर त्यांच्या विरोधातील खा. दिलीप गांधी यांची सून दिप्ती गांधी पिछाडीवर

अहमदनगर महापालिका | भाजप 25, शिवसेना 13, काँग्रेस-राष्ट्रवादी 13, इतर 3 जागांवर आघाडीवर 

अहमदनगर महानगरपालिका | शिवरायांचा अवमान करणारा श्रीपाद छिंदम 300 मतांनी पिछाडीवर, पोपट पाखरे मनसे आघाडीवर


अहमदनगर महापालिका,भाजप 20, शिवसेना 11, काँग्रेस-राष्ट्रवादी 10, इतर 3 जागांवर आघा

भाजप 16, शिवसेना 8, काँग्रेस-राष्ट्रवादी 9, इतर 3  जागांवर आघाडीवर

अहमदनगर महापालिका, अहमदनगर महापालिका, शिवसेना 5, भाजप 13, काँग्रेस-राष्ट्रवादी 8, इतर 3 जागांवर आघाडीवर

अहमदनगर महापालिका, शिवसेना 5, भाजप 8, काँग्रेस-राष्ट्रवादी 5, इतर 3 जागांवर आघाडीवर

अहमदनगर महापालिका, शिवसेना 4, भाजप 6, काँग्रेस 5, इतर 2 जागांवर आघाडीवर

अहमदनगर महापालिका, पहिला कल हाती, भाजप दोन जागांवर आघाडीवर

अहमदनगरमध्ये पोस्टल मतममोजणीला सुरुवात, काही क्षणात पहिला कल हाती येणार

एकीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचं डोळे लागून राहिले असतानाच राज्यात धुळे आणि अहमदनगर महापालिका निवडणुकांकडेही राज्याचं लक्ष लागलं आहे. 68 जागा असलेल्या धुळे महापालिकेत बहुमताचा आकडा 35 आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातील एकूण 68 जागांसाठी मतदान झाले असून त्यात अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
या निवडणुकीत खासदार दिलीप गांधी आणि शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि कॉंग्रेसचे युवा नेते सुजय विखे यांनी देखील या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली होती. त्यामुळे कधीही महानगरपालिकेत महापौर पद न मिळवलेल्या भाजपला एकहाती सत्ता मिळणार की राष्ट्रवादी आणि शिवसेना आपला झेंडा रोवणार हे पाहावे लागणार आहे.

 

संबंधित बातम्या

महानगरपालिका निवडणूक : धुळ्यात 60 तर अहमदनगरमध्ये 67 टक्के मतदान

Ahmadnagar Election Update : 5 वाजेपर्यंत 56 टक्के मतदान

अहमदनगर, धुळ्यात मतदारांचा कौल कुणाला?

महापालिका निवडणूक : श्रीपाद छिंदमच्या भावाकडून ईव्हीएमची पूजा

महापालिका निवडणूक : अहमदनगरमध्ये मतदानाला सुरुवात, शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ल्याने तणाव

अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत चुरस, उद्या मतदान

आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू अहमदनगरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात

अहमदनगर महापालिका निवडणूक प्रचारात जादूटोणा?