मुंबई : सुजय विखे पाटील यांच्या रुपाने काँग्रेसला धक्का बसल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी शिवनेरीवर दाखल झाले होते. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्यापाठोपाठ रणजित सिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असली तरी विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. शिवाय राष्ट्रवादीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचंही चर्चेत आहे.
दुसरीकडे माढाच्या जागेसाठी राष्ट्रवादीवर दबाव निर्माण करण्यासाठी विजयसिंह मोहिते पाटलांची यांची ही खेळी असल्याची चर्चा रंगली आहे. मुलगा रणजित सिंह मोहिते पाटील भाजपाच्या वाटेवर असून माढातून भाजपचे उमेदवार असण्याचे संकेत देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी मात्र रणजित सिंह मोहिते पाटलांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेचं वृत्त फेटाळलं आहे. साखर कारखान्याच्या सबसिडीची चर्चा करण्यासाठी रणजितसिंह आले होते, असं कारण त्यांनी दिलं. पण रणजित सिंह मोहिते पाटील आणि गिरीश महाजन भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे, हे मात्र नक्की.
सुजय विखेंपाठोपाठ रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Mar 2019 02:43 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली असली तरी विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी अद्याप जाहीर केलेली नाही. शिवाय राष्ट्रवादीकडून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचंही चर्चेत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -