Sikkim: सिक्कीममध्ये बर्फवृष्टीमध्ये अडकलेल्या एक हजारांहून अधिक पर्यटकांची भारतीय लष्करानं सुटका केलीय. नव वर्ष आणि नाताळ साजरा करण्यासाठी पर्यटक सिक्कीममध्ये गेले होते. परंतु, नाथू ला, त्सोमगो आणि लगतच्या भागात शनिवारी दुपारी तीव्र बर्फवृष्टी झाली. ज्यामुळं तापमान शून्याच्या खाली घसरलं. मोठ्या बर्फवृष्टीमुळं जवाहर लाल नेहरू रोड बंद झाला. यामुळं हे पर्यटक चांगू झीलजवळ अडकून पडले होते. अनेक तासांच्या बचावकार्यानंतर भारतीय लष्करानं पर्यटकांची सुखरूप सुटका केलीय. 


मिळालेल्या माहितीनुसार, सिक्कीममध्ये बर्फवृष्टी झाली. ज्यामुळं जवाहर लाल नेहरू रोडवर पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या. या रोडवरील एकूण 120 वाहनांमध्ये अंदाजे 1027 पर्यटक होते. जे 15 किलोमीटरवर अडकून पडले होते. या भागात तैनात असलेल्या भारतीय लष्करानं पर्यटकांची सुटका करण्यासाठी बचावकार्य सुरु केलं होतं. त्यानंतर अनेक तासांच्या बचावकार्यानंतर भारतीय लष्करानं पर्यकांची सुखरूप सुटका केलीय. तसेच पर्यटकांना बेस कॅम्पमध्ये हलवण्यात आले असून त्यांची जेवणाची सोय, उबदार कपडे आणि वैद्यकीय सहाय्य करण्यात आलं.


ट्वीट- 



चीनच्या सीमेला लागून असलेल्या अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. येथील डोंगर आणि रस्ते बर्फाच्या पांढर्‍या चादरीने झाकलेले आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी तवांगला येणाऱ्या पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा दिलाय. तवांगमधील बर्फवृष्टीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत त्यांनी पर्यटकांना इथे येण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेण्याचा सल्ला दिलाय. बर्फवृष्टीमुळं तवांगचे रस्ते वाहन चालवण्यासाठी धोकादायक असल्याचंही त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून म्हटलंय.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-