लखनऊ: सगळ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपच बाजी मारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी मोदी-योगींना जबरदस्त टक्कर दिली असली तरी भाजप आपली सत्ता कायम राखणार असल्याचं या पोलमधून स्पष्ट झालं आहे.


एकूण 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी एकूण 202 जागांची गरज आहे. भाजपला यावेळीही स्पष्ट बहुमत मिळणार तर अखिलेश यादव सत्तेपासून दूर राहणार असंच या एक्झिट पोलमधून दिसतंय. 


काँग्रेसला दोन आकडी संख्याही गाठणे अवघड ठरणार आहे असं या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येतंय.


काय सांगतोय एक्झिट पोल? 



Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी सरकार, भाजप सत्ता कायम राखणार; सी व्होटर सर्व्हेचा अंदाज


उत्तर प्रदेश हे भाजपसाठी महत्त्वाचं राज्य असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीमध्ये जोरदार प्रचार केला होता. त्याचा फायदा भाजपला झाल्याचं दिसून येतंय. 


उत्तर प्रदेशातील निवडणूक सात टप्प्यामध्ये पार पडली. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात 63.47 टक्के मतदान, दुसऱ्या टप्प्यात 64.66 टक्के, तिसऱ्या टप्प्यात 62.28 टक्के, चौथ्या टप्प्यात 62.55 टक्के, पाचव्या टप्प्यात 58.35 टक्के तर सहाव्या टप्प्यात 56.43 टक्के मतदान झालं आहे. सातव्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यत 54 टक्के मतदान झालं होतं. 


2017 साली भाजपला बहुमत
उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 317 जागा, समाजवादी पक्षाला 47 जागा, बसपाला 19 जागा तर काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या.


एक्झिट पोल मेथॉडोलॉजी काय?


सध्याच्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि अंदाज C-Voter एक्झिट पोल/पोस्ट पोल मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या दिवसानंतर राज्यभरातील 18 वर्षावरील व्यक्तींच्या मुलाखतींवर आधारित आहेत. सर्व मतदारांनी दिलेले तपशील, माहिती, अंदाज त्या दिवसावर आधारीत आहेत. राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात डेटा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळेस ही संख्या 100 च्या प्रमाणात नाही. आमचा अंतिम डेटा हा राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणातील सामाजिक-आर्थिक स्तराच्या  +/- 1%  प्रमाणात आहे. आम्ही संभाव्य निकालाच्या अगदी सर्वात जवळचा अंदाज वर्तवू शकतो असा आमचा विश्वास आहे.


या सर्वेंसाठी सर्व विधानसभा मतदारसंघातील नमुने घेण्यात आले आहेत. MoE मॅक्रो स्तरावर +/- 3% आणि सूक्ष्म स्तरावर +/- 5%  इतके आहे.


विश्लेषणासाठी आम्ही आमच्या अल्गोरिदमचा वापर केला आहे. प्रांतीय आणि विभागीतय मतांचे विश्लेषण करण्यासाठी Split-Voter  घटकाचा वापर केला आहे. याच घटकाचा वापर मतदानाची टक्केवारी, जागा किती मिळू शकतात, याचा अंदाज वर्तवण्यासाठी केला आहे. मिळणार असलेल्या मतांच्या टक्केवारीचा अंदाज आणि मिळणाऱ्या अंदाजित जागा यासाठी अंकगणिताचा शास्त्रीय वापर करण्यात आला आहे. संभाव्य मिळणाऱ्या जागांचा अंदाज वर्तवणे हा सर्वेक्षण विज्ञानाचा भाग नाहीत.


सी वोटर एक्झिट पोलसाठीचा डेटा हा मतदान केल्यानंतर मतदारांकडून घेतला जातो. निवडणूक संपेपर्यंत ही प्रक्रिया सुरू असते. एकाच राज्यासाठी ही मुलाखती घेतल्या जातात. यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघात यादृच्छिकपणे मतदान केंद्र निवडले जातात. अंदाज योग्य पद्धतीने वर्तवण्यासाठी आम्ही अल्गोरिदम प्रक्रियेचा वापर केला आहे.


सर्वेक्षणासाठी आम्ही यादृच्छिकपणे डेटा जमा केला आहे. जणगणनेनुसार असलेल्या स्थानिक लोकसंख्या, त्यातील वैविध्य आदींचा विचार करण्यात आला आहे. आम्ही  WAPOR कोडचा (World Association of Public Opinion Research) वापर केला आहे. असोसिएशन ऑफ पब्लिक ओपिनियन रिसर्च आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे ही आम्ही SOP म्हणून मान्य केली आहेत.



संबंधित बातम्या: