ABP C Voter Survey:   आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर विरोधकांकडून (Opposition) रणनीती आखण्याचे काम सध्या सुरू आहे. पाटणामध्ये (Patana) पार पडलेल्या बैठकीनंतर आता बेंगळूरुमध्ये (Bengaluru) विरोधकांची दुसरी बैठक पार पडत आहे. या बैठकीसाठी अनेक छोट्या पक्षांना देखील या आमंत्रण देण्यात आले आहे. विरोधकांच्या बैठकीनंतर दिल्लीमध्ये  मंगळवार 18 जुलै रोजी भाजपकडून देखील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर सी वोटरकडून एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. 


या सर्वेक्षणात विरोधकांनी छोट्या पक्षांना आमंत्रित करणे मास्ट्ररस्ट्रोक ठरु शकतो का हा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर लोकांकडून खळबळजनक उत्तरं मिळाली आहेत. या सर्वेक्षणात 55 टक्के लोकांनी म्हटलं आहे की हो विरोधकांच्या बैठकीत छोट्या पक्षांना आमंत्रित करणे हा विरोधी पक्षांचा मास्टरस्ट्रोक आहे. तर 31 टक्के लोकांनी यावर नाही असं उत्तर दिलं आहे. पण 14 टक्के लोकांनी यावर माहित नाही असं उत्तर दिलं आहे. 


विरोधी पक्षांच्या बैठकीत लहान पक्षांना आमंत्रित करणं हा विरोधकांचा मास्टरस्ट्रोक?


 
स्रोत - सी वोटर 


हो - 55 टक्के
नाही - 31 टक्के
सांगत येत नाही - 14 टक्के


आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकारणात अनेक नवी समीकरणं पाहायला मिळत आहेत. विरोधी पक्षांची दुसरी बैठक बंगळूरमध्ये पार पडत असून या बैठकीमध्ये एकूण 26 राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. पटणामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये एकूण   15 पक्ष सहभागी झाले होते.  त्यामुळे या बैठकीमध्ये अनेक लहान पक्षांना आमंत्रित करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे.  बंगळूरमध्ये ही दोन दिवसीय बैठक असणार आहे. या बैठकीमध्ये विरोधक एकजूटीच्या दिशेने ठोस निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


ममता बॅनर्जी आणि शरद पवारांची अनुपस्थिती?


महाराष्ट्रात झालेल्या राजकीय खळबळीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या बैठकीचा भाग असलेल्या बंगळुरूतील डिनरला शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच, टीएमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी या डिनरपासून आधीच स्वतःला दूर केलं आहे. मात्र, 18 जुलै रोजी होणाऱ्या चर्चेत ममता बॅनर्जी सहभागी होणार आहेत. शरद पवार यांच्याकडे विरोधकांच्या एकजूटीचे सर्वात मोठे नेते म्हणून पाहिलं जातं. पण विरोधकांच्या पहिल्या आणि आताच्या बैठकिच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे आता या बैठकीमध्ये शरद पवार उपस्थित राहणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


हे ही वाचा : 


Opposition Parties Meeting: 24 पक्ष, 6 अजेंडे... विरोधी पक्षांची दुसरी महाबैठक; डिनरसाठी शरद पवार- ममता बॅनर्जी मात्र अनुपस्थित