Karnataka Assembly Elections 2023: कर्नाटकात काँग्रेसने ऐतिहासिक मुसंडी मारत एकहाती सत्ता खेचली आहे. त्याचबरोबर 2018 मध्ये सरकार पाडणाऱ्या आमदारांनाही धडा शिकवताना 17 पैकी 7 भाजप आमदारांना घरी बसवले आहे. दुसरीकडे चौघांना भाजपकडून उमेदवारीच दिली नव्हती. दुसरीकडे, कर्नाटकी जनतेने धार्मिक वाद निर्माण करणाऱ्या बीसी नागेश यांच्यासह 11 मंत्र्यांना घरी पाठवले आहे. कर्नाटकने तब्बल 136 जागांवर अधिक जागांवर निर्णायक आघाडी घेत एकहाती सत्ता आणली आहे. 


दरम्यान, कर्नाटकात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. निकालानंतर लगेचच, भाजपला 224 च्या सदस्य असलेल्या सभागृहात 104 आमदारांसह एक-सर्वात मोठा पक्ष म्हणून सरकार स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आले होते. तथापि, काँग्रेस आणि जेडीएस (काँग्रेस 76, JD-S 37 आणि तीन अपक्ष) त्वरीत एकत्र आले होते. तथापि, एका वर्षाच्या आत, काँग्रेस-जेडी(एस) ने त्यांच्या 17 आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये सामील झाले होते.  


त्यानंतरच्या डिसेंबर 2019, नोव्हेंबर 2020 आणि मे 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत या 17 पैकी 15 जणांना तिकिटे देण्यात आली. 12 भाजपचे आमदार म्हणून परत निवडून आले. चालू निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या दोन याद्यांमध्ये 17 पैकी 14 आमदारांना स्थान दिले होते. त्यापैकी एक त्यांच्या मुलामार्फत आहे. रोशन बेग, आर शंकर आणि एच विश्वनाथ यांना तिकीटच नाकारण्यात आले होते. 


सरकार पाडण्यामधील सहभागी पराभूत आमदार



  • प्रतापगौडा पाटील

  • बीसी पाटील

  • केसी नारायणगौडा

  • श्रीमंत पाटील 

  • के सुधाकर 

  • एमटीबी नागराज 

  • महेश कुमठ्ठळी 


कोणत्या आमदारांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आले?



  • एएच विश्वनाथ

  • आर. रोशन बेग 

  • आनंद सिंह यांच्या मुलाला तिकीट  (सिद्धार्थ) देण्यात आले. 


विजयी आमदारांची यादी 



  • शिवराम हेब्बर 

  • एसटी सोमशेखर 

  • बरायती बसवराज 

  • के गोपालय्या 

  • एन मुनीरत्न 

  • रमेश जारकीहोळी 


पराभूत झालेले मंत्री 


1) गोविंद काराजोला (सिंचन मंत्री)
2) बी. श्रीरामुलू (वाहतूक मंत्री)
3) व्ही सोमन्ना (पायाभूत सुविधा विकास मंत्री)
4) जे. सी. मधु स्वामी (कायदा मंत्री)
5) मुर्गेश निरानी (उद्योग मंत्री
6) बी.सी. पाटील (कृषी मंत्री)
7) के सुधाकर (आरोग्य मंत्री)
8) एमटीबी नागराज (लघु उद्योग मंत्री)
9) केसी नारायणगौडा (क्रीडा मंत्री)
10) बीसी नागेश (प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री)
11) शंकर पाटील (वस्त्रोद्योग मंत्री)


इतर महत्वाच्या बातम्या