- मुख्यपृष्ठ
-
Election
-
निवडणूक
LIVE BLOG : राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा लवकरच भाजप प्रवेश, शरद पवारांची दिलजमाई अपयशी
LIVE BLOG : राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा लवकरच भाजप प्रवेश, शरद पवारांची दिलजमाई अपयशी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
26 Jul 2019 11:18 PM
एकनाथ गायकवाड मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष
जालना : माजी मंत्री व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. शंकरराव राख यांचे आज शुक्रवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
यवतमाळ - राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर नाईक यांचे चिरंजीव इंद्रनील नाईक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा
चित्र वाघ यांनी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा दिला,
शरद पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला
पाटोदाच्या वादग्रस्त तहसीलदार रूपा चित्रक निलंबित
हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची जागा मिळणं कठीण,
- इंदापूरची जागा राष्ट्रवादी पक्ष लढवण्याचा भूमिकेत
- इंदापूर ही जागा दत्ता भरणे जिंकू शकतात , हा राष्ट्रवादीचा विश्वास
- त्यामुळे येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत राष्ट्रवादीच इंदापुरची जागा लढवण्याची शक्यता
- राष्ट्रवादीने जागा सोडली नाहीतर हर्षवर्धन पाटील अपक्ष म्हणून लढवणार की भाजप मधून या चर्चेला सुरुवात
- नुकताच हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली होती..
जेव्हीएलआर मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे नागरिकांनी शक्यतो या मार्गावरुन प्रवास करणे टाळायला हवे.
राष्ट्रवादीला लवकरच आणखी एक धक्का,
आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा भाजप प्रवेश निश्चित,
शरद पवारांची दिलजमाई अपयशी,
खा उदयनराजे शिवेंद्रराजे वादातून राष्ट्रवादीत फुट,
उदयनराजें विरोधातील तक्रारीचे निरसन,
भाजप प्रवेशाचा मुहुर्त लवकरच
बीएस येदियुरप्पा यांनी कर्नाटक मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, राज्यपाल वजुभाई वाला यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ, येदियुरप्पा चौथ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
कुर्ला पश्चिमेकडील अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे
ईव्हीएमविरोधात मोर्चाबांधणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना भेटणार
मुंबईत सध्याकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतल्या दादर, माटुंगा आणि वडाळा भागातही पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
वसई-विरार महापालिकेचे महापौर रुपेश जाधव यांचा महापौर पदाचा राजीनामा, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्याची चर्चा
मुंबईत दुपारपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे भांडूप, अंधेरी, सायन परिसरात पाणी साचले आहे.
वैभव पिचड, चित्रा वाघ येत्या 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता, गेल्या दोन दिवसात तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती,
प्रसाद लाड यांच्या मदतीने राष्ट्रवादीला भगदाड पाडण्याचे प्रयत्न
,30 जुलैला काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर देखील भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
परभणी : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणीत जोरदार पाऊस, पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
बीएस येडियुरप्पा आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता
बीएस येडियुरप्पा आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता
सोलापूर : राष्ट्रवादीच्या दोन विद्यमान आमदारांनी उमेदवारीच्या मुलाखतीकडे पाठ, बबनदादा शिंदे, दिलीप सोपल मुलाखतीला गैरहजर, सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेसाठी अजित पवार घेत आहेत राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या मुलाखती, बबन शिंदे भाजपच्या तर दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा
सिंधुदुर्ग : आंबोली घाटात अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी, अपघातात दोघे गंभीर जखमी
जम्मू-काश्मीर : खराब हवामानामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद द्रास येथे जाऊ शकणार नाहीत, श्रीनगरमधील बदामीबाग येथील कार्यक्रमात सामील होणार
मुंबई : भारतीय लष्करात महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या मुलांचा ‘केजी टू पीजी’ पर्यंतचा शैक्षणिक खर्च सिद्धीविनायक मंदिर न्यास उचलणार, विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय
पुणे : येवलेवाडीतील दांडेकरनगर येथे एका गोडाऊनला आग, अग्निशमन दलाच्या 7 गाड्या दाखल, आग विझवण्याचे काम सुरु
रत्नागिरीत
मुसळधार पावसाला सुरुवात,
हवामान खात्याकडून पुढचे 48 तास मुसळधार पावसाचा इशारा,
जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावाना सतर्कतेचा इशारा,
दापोली, मंडणगड, गुहागर, लांजा, रत्नागिरीत सर्वाधिक पावसाची नोंद
पालघर : जिल्ह्यातील सर्वात मोठं धामणी धरण भरले, पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. शरद पवारांचे खंदे समर्थक सचिन अहिरांच्या शिवसेनाप्रवेशामुळे राष्ट्रवादीत भूकंप, मुंबई अध्यक्षपदावरून नवाब मलिक-जयंत पाटलांमध्ये फूट, सूत्रांची माहिती
2. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील वर्षा येथे सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
3. लोकसभेत तिसऱ्यांदा तिहेरी तलाकविरोधी विधेयक मंजूर, आता राज्यसभेत सरकारची परीक्षा, चर्चेदरम्यान ओवेसी आणि पूनम महाजनांमध्ये घमासान
4. कारगिल विजय दिवसाची आज 20 वी वर्षपूर्ती, राज्यात तसेच देशभरात शहिदांच्या स्मरणार्थ विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन
5.कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी दोन महिने देशाच्या सीमेचं रक्षण करणार, लष्कराकडून विशेष परवानगी, काश्मीरमध्ये गस्तीसाठी नियुक्ती
6. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा एबीपी माझाकडून गौरव, माधुरी दीक्षित, राधिका आपटे, बेल्लारे, पेंढारकर ठरले सन्मानाचे मानकरी