LIVE BLOG : उपअभियंत्यावर चिखलफेक, आमदार नितेश राणेंची न्यायालयीन कोठडी 23 जुलैपर्यंत

देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा पाहा एबीपी माझाच्या लाईव्ह अपडेटमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Jul 2019 10:55 PM
विश्वचषकातील भारत विरुद्ध न्यूझीलंड उपान्त्य सामना - पावसामुळे आजच्या दिवसाचा खेळ उद्यावर ढकलला, भारतीय प्रमाण वेळेनुसार उद्या दुपारी तीन वाजता उर्वरित सामना पुढे सुरु होणार
#INDvsNZ | पावसामुळे न्यूझीलंडचा खेळ थांबला, 46.1 षटकात न्यूझीलंड 211/5
सिंधुदुर्ग : हायवे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक करत मारहाण केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह 19 आंदोलकांना 23 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी, कणकवली दिवाणी न्यायालयाचा निर्णय
भारत-न्यूझीलंड सेमीफायनल, न्यूझीलंडला पहिला धक्का, गप्टिल एका धावेवर बाद
हिंगोली : न्यायालयातील वॉल कंपाऊंड भिंत कोसळून आठ मोटरसायकलचं मोठं नुकसान, न्यायालयीन कामकाज सुरू असताना अचानक भिंत पडल्याने घटनास्थळी मोठी वकिलासह नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
चंद्रपूर : पिक उभं असलेल्या जमिनीवर वनविभागाचा वृक्षारोपणाचा प्रयत्न, वरोरा तालुक्यातील विलास देऊळकर नामक शेतकऱ्याने वन पथकासमोर विष घेत आत्महत्येचा केला प्रयत्न, चिनोरा येथील शेतातील घटना
#INDvNZ : विश्वषकात आज पहिला उपांत्य सामना, नाणेफेक जिंकून न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी
राष्ट्रवादीचे आमदार पाडुरंग बरोरा यांनी दिला राजीनामा ,
पाडुंरंग बरोरा हे शहापूर विधानसभेचे आमदार ,

लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार


मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय | अल्पसंख्याक समुदायातील महिलांना बचतगटांची स्थापना करुन कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याच्या योजनेस मान्यता.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण व गुहागर या दोन तालुक्यांसाठी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाची स्थापना चिपळूण येथे करण्याचा निर्णय.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय | जळगाव जिल्ह्यातील निंभोरासिम येथील हतनूर धरणबाधित मागासवर्गीय कुटुंबांना विशेष बाब म्हणून संपादित घराच्या किंमतीऐवढी नुकसान भरपाई देणार.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय | सार्वजनिक हितासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) हस्तांतरित होणाऱ्या जमिनींचे मुद्रांक शुल्क माफ.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय | राज्याच्या बंदर विकास धोरण-2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यामध्ये विविध सुधारणा करण्यास मंजुरी.

मुंबई : अक्षय कुमार, विद्या बालन, तापसी पन्नू यांची प्रमुख भूमिका असलेल्या मिशन मंगल या चित्रपटाचा टीझर आज प्रदर्शित झाला. येत्या 15 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय | सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय झालेली जमिनींची हस्तांतरणे नियमानुकूल करण्यासाठी इनाम किंवा वतन विषयक प्रमुख कायद्यांत सुधारणा करण्यास मान्यता.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय | राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय | राज्यातील अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू.

जालना : पद्मावती धरणाच्या मुख्य भिंतीला गळती, जिल्ह्यातील भोकरदनच्या धामणा धरणानंतर पद्मावती धरणाला देखील गळती लागलेली पाहायला मिळतेय. धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीला गळती लागल्याने ग्रामस्थ भयभीत झालेत. धामना धरणाचे लिकेजेस बंद होत आहेत तोवर या पद्मावती धरणाचे लिकेजस सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
जालना : पद्मावती धरणाच्या मुख्य भिंतीला गळती, जिल्ह्यातील भोकरदनच्या धामणा धरणानंतर पद्मावती धरणाला देखील गळती लागलेली पाहायला मिळतेय. धरणाच्या मुख्य संरक्षक भिंतीला गळती लागल्याने ग्रामस्थ भयभीत झालेत. धामना धरणाचे लिकेजेस बंद होत आहेत तोवर या पद्मावती धरणाचे लिकेजस सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं आहे.
मुंबई : काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात लिहिलेलं जुनं पत्र समोर, उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम न केल्याचा आरोप
मुंबई : काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांचं काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात लिहिलेलं जुनं पत्र समोर, उत्तर मुंबई मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम न केल्याचा आरोप
अहमदनगर | अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहासमोर एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला. अपघातानंतर बसने जागेवरच पेट घेतला. अपघातात बसमधील सुमारे 23 प्रवासी जखमी झाले आहेत. तर बस चालक आणि वाहक या गंभीर जखमी आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सध्या 28.88% पाणीसाठा, गेल्यावर्षी याच दिवशीचा पाणीसाठा 38.4% होता, सध्याचा एकूण पाणीसाठा 417942 दशलक्ष लिटर...अप्पर वैतरणात अजून समाधानकारक पातळी नाही. त्यामुळे वापरण्यायोग्य पाण्याची पातळी 0, मोडक सागर - 76810 दशलक्ष लिटर, तानसा - 66428 दशलक्ष लिटर, मध्य वैतरणा - 83935 दशलक्ष लिटर, भातसा - 169475 दशलक्ष लिटर, विहार - 14090 दशलक्ष लिटर, तुलसी - 7205 दशलक्ष लिटर

पार्श्वभूमी

1. मनसे अध्यक्ष राज ठाकरे-सोनिया गांधींमध्ये नवी दिल्लीत गुफ्तगू, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर खलबतं, तर ईव्हीएमविरोधात राज ठाकरे आक्रमक

2. मुंबई-कोकणात पुढील 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा, तुफान पावसानं मुंबईकरांची दैना, पांडवकडा धबधब्याचा ओढा फुटल्यानं सायन-पनवेल महामार्ग जलमय

3. मराठा आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 12 जुलैला सुनावणी, हायकोर्टानं दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल

4. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात संघाच्या भूमिकेचा बीए अभ्यासक्रमात समावेश, विद्यापीठ प्रशासनाकडून मात्र बोलण्यास नकार

5. कर्नाटकात पुन्हा राजकीय अस्थिरता, काँग्रेस-जेडीएस सरकारमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे, तर भाजपकडून कुमारस्वामींच्या राजीनाम्याची मागणी

6. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत आज टीम इंडियाचा सामना विल्यमसनच्या न्यूझीलंडशी, मॅन्चेस्टरमध्ये किवीजवर मात करुन चौथ्यांदा फायनल गाठण्यास भारत उत्सुक

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.