LIVE BLOG : बदलापूर कर्जत सेक्शन सुरू, 8.32 वाजता पहिली ट्रेन बदलापूरहून कर्जतला रवाना, प्रवाशांना मोठा दिलासा

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jul 2019 09:43 PM
अभिनेता सुबोध भावेचा नाटकात काम न करण्याचा इशारा,
नाटकादरम्यान प्रेक्षकांच्या मोबाईल वापरावर संताप,
फेसबुक पोस्टद्वारे सुबोधकडून संताप व्यक्त
ठाणे : मुरबाड- कल्याण महामार्गावरिल उल्हास नदीवरील रायता पुल दुरुस्त, महामार्गावरिल वाहतूक संध्याकाळी 7 वाजेपासून सुरु
बदलापूर कर्जत सेक्शन सुरू, 8.32 वाजता पहिली ट्रेन बदलापूरहून कर्जतला रवाना, मध्य रेल्वेने एक दिवस आधीच काम पूर्ण, 300 हून अधिक कर्मचारी कामाला, प्रवाशांना मोठा दिलासा
औरंगाबाद : मनसेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण यांचा वंचित आघाडीत प्रवेश, वंचित बहुजन आघाडीचा मेळावा
औरंगाबाद : एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांची जागा वाटपाची बैठक, शनिवारी रात्री उशिरा झाली बैठक, एमआयएम 100 जागाच्या मागणीवरून 60 जागांवर तडजोड करणार, सूत्रांची माहिती, एमआयएम प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आणि वंचित आघाडीच्या संसदीय दलासोबत झाली बैठक, 2 दिवसात जागावाटप बाबत निर्णय होणार इम्तियाज जलील यांची माहिती

एकाबाजूला पर्जन्ययाग सुरु होताच पंढरपूरमध्ये जोरदार पावसाला सुरुवात, आज एकादशी असल्याने विठ्ठल दर्शनाची रांग गोपाळपूर पर्यंत, उघड्या रांगेमुळे भाविकांचे हाल सुरु
लोणावळा ते पवनानगर दरम्यानचा रस्ता खचलाय. पवना धरणा जवळ हा प्रकार घडलाय. वळणा-वळणाचा हा रस्ता आहे, वरील रस्त्यालगतची माती अगदी खालच्या रस्त्यापर्यंत आलेली आहे. सध्या हा मार्ग सुरुये, पण पावसाचा जोर कायम राहिला तर मार्ग बंद करावा लाग शकतो. तेंव्हा इथे येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घ्यायला हवी.
धनगर समाज उधळणार कॉंग्रेस राष्ट्रवादीने प्रियांका गांधी व शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित केलेला मेळावा
राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री राजेश टोपे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा होती, मात्र या सर्व अफवा असून पक्षाच्या विचारशी बांधील असल्याचं स्वत: राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण
औरंगाबाद : एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांची जागा वाटपाची बैठक, शनिवारी रात्री उशिरा झाली बैठक, एमआयएम 100 जागाच्या मागणीवरुन 60 जागांवर तडजोड करणार, सूत्रांची माहिती, एमआयएम प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील आणि वंचित आघाडीच्या संसदीय दलासोबत झाली बैठक, 2 दिवसात जागावाटप बाबत निर्णय होणार, इम्तियाज जलील यांची माहिती
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून स्वीकारला पदभार
गोंदिया : सडक अर्जुनी तालुक्यात भीषण अपघातात चौघांचा मृत्यू तर 14 जखमी, शेतीच्या कामासाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर नाल्यात उलटला, तिघांचा ट्रॅक्टर खाली दबून तिघांचा जागीच मृत्यू
कर्नाटक : काँग्रेस-जेडीएसचे 14 बंडखोर आमदार अपात्र घोषित सभापतींकडून 14 आमदारांबाबत घोषणा
कल्याण : रायता पुलाजवळ रस्त्याचा काही भाग खचला, कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प, काल उल्हास नदीचं पाणी पुलावरून गेल्याने बॅरिकेड्सही तुटले
उल्हासनगरमध्ये घराचा स्लॅब कोसळून सात वर्षीय मुलाचा मृत्यू, कॅम्प ३ मधील पवई चौकात अंबिका सागर इमारतीत दुर्घटना, नीरज सातपुते असं मृत मुलाचं नाव, आजी जखमी झाली
शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद, मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करतात असा पवारांचा आरोप, चांगलं काम केलेलं असताना भुजबळांवर कारवाई झाली, लोकप्रतिनिधींना धमकावण्याचा सरकारचा प्रयत्न- शरद पवार
शरद पवारांची पुण्यात पत्रकार परिषद, मुख्यमंत्री स्वत: आमदारांना फोन करतात असा पवारांचा आरोप, चांगलं काम केलेलं असताना भुजबळांवर कारवाई झाली, लोकप्रतिनिधींना धमकावण्याचा सरकारचा प्रयत्न- शरद पवार
लोकप्रतिनिधींना धमकावण्यासाठी ईडी, सीबीआयचा सरकारकडून वापर, शरद पवारांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादीच्या नेत्यांविषयी वास्तव, अवास्तव चर्चा सुरु आहेत, निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर सुरु आहे : शरद पवार

मुंबई : बदलापूर ते कर्जत सेवा अजूनही बंदच,

सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक बंद ठेवली,

सीएसएमटी ते बदलापूर लोकल वाहतूक सुरू
नाशिक शहराची तहान भागवणारं गंगापूर धरण 74 टक्के भरलं
मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द, कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर होता मेगाब्लॉक

मुंबई : जे जे हॉस्पिटलजवळ निलगिरी हॉटेलच्या शिडीचा काही भाग कोसळला, इमारत जुनी असल्याने रिकामी करण्यात आली होती, आत एक मुलगा फसल्याची प्राथमिक माहिती
नागपूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया येथे सुरक्षेसाठी तैनात एसआरपीएफ जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या,

प्रसन्ना मस्के असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव
मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज, नागरिकांनी सावध राहण्याचा मुंबई महापालिकेचा इशारा

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने, मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा हवामान खात्याचा इशारा

2. वांगणीत अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील 1 हजार 50 प्रवाशांची 5 तासांत सुटका, मुक्या प्राण्यांनाही जीवनदान, एनडीआरएफच्या टीमचं कौतुक, घटनास्थळावरुन माझाचा ग्राऊंड रिपोर्ट

3. कल्याणमध्ये म्हारळ, कांबा, वरप गावात उल्हास नदीचं पाणी शिरलं, माझाच्या बातमीनंतर अकलेल्यांना एनडीआरएफनं वाचवलं, तर पेट्रोलपंपाच्या छतावर अडकलेल्यांचीही सुटका

4. चिपळूणमध्ये परशुराम घाटात अर्धा डोंगर खचला, अजूनही दरड हटवण्याचं काम सुरुच, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा, प्रवासी रखडले

5. विरोधकांना फोडण्यासाठी सत्तेचा गैरवापर, शरद पवारांचा घणाघात, पिचड पिता-पुत्र राष्ट्रवादीला रामराम, यवतमाळचे इंद्रनील नाईक शिवसेनेत जाण्य़ाची शक्यता

6. संपत्ती जप्तीविरोधात विजय माल्ल्याची सुप्रीम कोर्टात धाव, आपल्यासह नातेवाईकांच्या संपत्ती जप्तीवर रोक आणण्यावर माल्ल्याची कोर्टाला याचना

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.